शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

साखर दराच्या घसरणीमुुळे साखर उद्योग अडचणीत -संजीव देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:28 PM

सातारा : साखरेच्या दराची भविष्यातील कोणतीही शाश्वती नसताना व वर्षभर किती दराने साखर विक्री होईल, याची खात्री

ठळक मुद्दे३५०० वरून साखर उतरली ३०५० वर; नियंत्रण हटविण्याचे उद्योजकांमधून मागणीशेतकºयांची थकबाकी राहणे, हे कारखान्यांना व सरकारला परवडणारे नाही.

सातारा : साखरेच्या दराची भविष्यातील कोणतीही शाश्वती नसताना व वर्षभर किती दराने साखर विक्री होईल, याची खात्री नसतानाही कारखान्यांनी तडजोड करून दर जाहीर केलेले आहेत. मागील एक महिन्यात साखरेच्या दरात ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल इतकी घसरण होऊन बाजारातील साखरेच्या किमती ३०५० ते ३१०० प्रतिक्विंटल इतक्या दराने साखर विक्री चालू आहे. घसरलेले साखरेचे दर विचारात घेता कारखान्यांनी एफआरपी आणि २०० ते ४०० पर्यंत जादा दर देण्याची केलेली तयारी अडचणीची ठरत आहे,’ अशी माहिती कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली.

सन २०१७-१८ चा गळीत हंगाम सुरू होताना साखरेचे दर ३५०० ते ३५५० रुपये क्विंटलच्या दरम्यान होते. त्यामुळे शेतकºयांनी ३२०० रुपयांपर्यंत पहिली उचल द्यावी, अशी मागणी केली. व त्यावेळेचे साखरेचे दर पाहता त्याप्रमाणे उचल मिळावी, अशी भावना सर्वच शेतकºयांची दिसून येत होती. त्यात तडजोड होऊन व शेतकरी संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी व साखर कारखाने प्रतिनिधी यांचे बैठकीत एफआरपी आणि २०० असा निर्णय होऊन गाळप हंगाम सुरू झाला.

मागील आठ ते दहा वर्षांत शेतकरी संघटना गळीत हंगाम सुरू करणे अगोदर पासूनच ऊसदराबाबत आग्रही असतात त्यातून शेतकरी, कारखाने यांच्या संघर्षात सरकारला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हस्तक्षेप करावा लागतो. कारखाने व शेतकरी यांच्यामध्ये सतत संघर्ष होऊ नये म्हणून या सर्व गोष्टीतून कायमचा तोडगा काढावा म्हणून शासनाने रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.

त्यानुसार रंगराजन समितीने सुचविलेल्या तोडग्याप्रमाणे शेतकºयांना कारखान्यांचे उत्पादनाच्या साखर विक्रीतून उत्पन्नातून साखर विक्री मूल्यातून ७० टक्के व ७५ टक्के साखर विक्री तसेच उपपदार्थ विक्री मूल्यांचा हिस्सा द्यावा व ३० टक्के हिस्स्यात कारखान्याने स्वत:चा खर्च भागवावा, असे सुचवले होते. तसेच साखर उद्याोग नियंंत्रण मुक्त करावा, अशाही शिफारशी केल्या होता त्या शिफारशीची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी शेतकरी व त्यांचे प्रतिनिधी व साखर उद्योजक यांच्याकडून केली जात होती.केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून अंशत: नियंत्रित साखरेचा कोटा ठरवून द्यावा व साखरेच्या दरातील घसरण थांबविण्यास मदत करायला हवी, अन्यथा देशातील अनेक साखर कारखाने एफआरपी सुद्धा देऊ शकणार नाहीत व शेतकºयांची ऊस बिले मोठ्या प्रमाणात थकित राहण्याचा धोका असून त्यामुळे देशातील एवढ्या मोठ्या उद्योगाला वाºयावर सोडलेले सरकारला परवडणारे नाही.

साखर कारखान्यापुढील अडचणी व उपाय योजनाशेतकरी व साखर उद्योगाचे हित लक्षात घेऊन सरकारने काहीकाळ अंशत: साखर विक्रीवर नियंत्रण आणून साखर मर्यादित बाजारपेठेत येईल व किमती घसरण न होता त्या स्थिर राहतील, यासाठी तातडीने हस्तक्षेप करायला हवा. तसेच साखर विक्री नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे.

कारखान्याकडील उत्पादनाच्या काही राखीव साठा कारखान्याच्या गोदाममध्ये काही कालावधीकरिता साठवून ठेवला जातो. त्या साखर साठ्यावरील बँकेचे उचल घेतलेल्या रकमेचे व्याज, विमा खर्च केंद्र शासनाकडून दिला जातो. ज्या ज्यावेळी अतिरिक्त साखर उत्पादन होते. साखरेचा बफर स्टॉक करण्याची आवश्यकता आहे. तसेच इतर देशात साखरेचे उत्पादन पाहून निर्यातीस प्रोत्साहन दिले जाते. निर्यात शुल्क रद्द करून २० टक्के असणारी निर्यात ड्यूटी ० टक्के करण्यात आली आणि आयात शुल्क वाढविली तर परिस्थिती सुधारेल.- संजीव देसाई, कार्यकारी संचालक,  अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना