लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : ‘सहकारात शेतकरी जसा महत्त्वाचा आहे तसाच कामगारही महत्त्वाचा आहे. शेतकरी टिकला पाहिजे तसा कामगारसुद्धा टिकला पाहिजे. उसाचा भाव ३५०० रुपये झाला. कामगारांच्या बोनस व पगारवाढी प्रश्नांबाबत कामगारांच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी करण्यास मी पुढाकार घेईन,’ अशी ग्वाही देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.यशवंतनगर, ता. कºहाड येथे साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल व संसदीय कामकाजाची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल खासदार शरद पवार यांचा जाहीर सत्कार आणि साखर कामगारांचा भव्य मेळावा असा दुहेरी कार्यक्रम बुधवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडला. याप्रसंगी खासदार पवार बोलत होत होते. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रीय सहकारी साखर संघ दिल्लीचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, सहकारी साखर कारखाना संघ मुंबईचे माजी अध्यक्ष विजयसिंंह मोहिते-पाटील, माजी ग्रामविकास मंत्री आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकारी साखर कारखाना मुंबईचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार मोहनराव कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार राजेंद्र पाटील, माजी आमदार मानसिंंगराव नाईक, माजी आमदार राजन मोहोळ, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, आमदार जयंत पाटील, तात्यासाहेब काळे आदींची मनोगते झाली. यावेळी राज्यातील साखर कामगारांच्या वतीने खासदार शरद पवार यांना चांदीचा मंगलकलश, शाल, श्रीफळ, दुर्गामातेची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, सभासद उपस्थित होते.कामगारांचा बोनस काय वाढत नाय... तेव्हा हे वागणं बरं नव्हं!शरद पवार यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावर उपस्थित असलेले सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांना उद्देशून प्रश्न केला. मोहनराव, तुम्ही किती दर दिला? यावेळी ३,३५१ असे उत्तर ऐकल्यावर पवार पुढे म्हणाले, पूर्वीप्रमाणे दराच्या दोन टक्क्यांनी कामगारांच्या बोनसची रक्कम किती होईल? असा प्रश्न करत खासदार पवार म्हणाले, उसाचे दर वाढत गेले; पण कामगारांचा बोनस काय वाढत नाय...तेव्हा हे वागणं बरं नव्हं ! असा चिमटा काढताच कामगारांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला.
साखर कामगारांनी समन्वय समिती तयार करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 11:23 PM