शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

जलआराखड्यावर सूचना, हरकती द्या : शिवतारे

By admin | Published: July 10, 2015 10:08 PM

पंधरा दिवसांची मुदत : उर्ध्व कृष्णा उपखोरेच्या संकेतस्थळावर आराखडा प्रसिद्ध

कऱ्हाड : राज्य शासनाचा जलसंपदा विभाग व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्यावतीने एकात्मिक राज्य जलआराखडा उर्ध्व कृष्णा उपखोरे (के १) संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला असून याबाबत १५ दिवसात लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांना सूचना किंंवा हरकती द्याव्यात, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले.येथील वेणूताई चव्हाण सभागृहामध्ये शुक्रवारी जलसंपदा विभाग, कृष्णा खोरे विकास महामंडळ, कृष्णा खोरे एकात्मिक राज्य जल आराखडा अंतर्गत उर्ध्व कृष्णा उपखोऱ्यातील (के १) लाभधारक घटकांची सल्लामसलत कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री शिवतारे बोलत होते. यावेळी आमदार उल्हास पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक आर. बी. घोटे, मुख्य अभियंता बी. ए. शहा, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, सांगलीचे एच. बी. गुणाले, कोल्हापूरचे साळुंखे, उरमोडीचे कार्यकारी अभियंता शरद दाभाडकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आदी उपस्थित होते.पालकमंत्री शिवतारे म्हणाले, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण २००५ मध्ये करण्यात आले. त्याची अंमलबजावणी केली असती तर सिंंचनाचे काम सुरळीत झाले असते. १९६२ ते १९८७ या कालावधीत ६ आयोग होते. या सर्वांनी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात तसेच शाश्वत उपसासिंंचन योजना मापदंड न करता करायला हवी. त्याचबरोबर जलसंपदाची कामे करा, अशा सूचना केल्या होत्या. जलयुक्त शिवार अभियान हे त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने सुरु केले आहे. मोठमोठ्या उद्योजकांना निमंत्रित करताना त्यांना सामाजिक सुरक्षितता दिली पाहिजे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्व प्रकल्प पूर्ण करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम निश्चितपणे होईल. त्यासाठी येत्या १५ दिवसात लेखी स्वरुपात हरकती, सूचना अधिकाऱ्यांकडे द्याव्यात. आमदार उल्हास पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. समप्रमाणात पाणी वाटप करा. दुष्काळी भागाकडे सर्वप्रथम पाणी देऊन मग उर्वरित पाणी पुढे द्यावे, अशी सूचना माजी आमदार येळगावकर यांनी केली. अधीक्षक अभियंता घोगरे यांनी जिल्ह्याचे संगणकीकृत सादरीकरण केले. (प्रतिनिधी)