सातारा : मुंबई येथून सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या एका प्रेमीयुगुलाने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गडावरून खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. नीलेश अंकुश मोरे (वय २८, सध्या रा. मुंबई, मूळ रा. बोडकेवाडी, ता. पाटण), पूनम अभय मोरे (वय २६, सध्या रा. मुंबई, मूळ रा. बोडकेवाडी, ता. पाटण) अशी मृतांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, नीलेश मोरे व पूनम मोरे हे दोघे बोडकेवाडीतील एकाच भावकीतील असून, दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. पूनमचा नुकताच एका तरुणासोबत विवाह झाला होता. ती पतीसोबत मुंबईत राहत होती. तसेच नीलेशही नोकरीनिमित्त मुंबईतच राहत होता.
सुटीनिमित्त दोघे गावी आले होते. त्यावेळी सज्जनगड येथे फिरण्यासाठी आले असता दुपारी सज्जनगडावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह दरीतून काढण्याचे काम सुरू आहे.