वडूज : ग्रामीण भागात पेरू विक्रेत्यांकडून पेरूंची विक्री केली जात आहे. ऐंशी ते शंभर रुपये किलो दराने पेरूंची विक्री केली जात असून, खरेदीसाठी लोकांकडून सकाळी सात ते अकरा या वेळेत ग्राहकांकडून गर्दी केली जात आहे. काही वेळेला पेरू विक्रेते सायकलवरुन फिरत असतात.
अस्ताव्यस्त पार्किंग
सातारा : शहरातील बसस्थानक परिसरामध्ये वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सकाळी संचारबंदी शिथील असताना याचा सर्वाधिक त्रास होतो. रिक्षा चालकांकडून रिक्षा थांबविल्या जात असून, परिणामी चौकात वाहतूक कोंडी होत आहे.
वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
शिरवळ : शिरवळ शहरातील प्रमुख चौकात वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीत वाढ झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. सकाळी संचारबंदी शिथील असताना येथील व्यापाऱ्यांना याचा विनाकरण त्रास सोसावा लागत आहे.
बाजारात कैऱ्यांना मागणी
सातारा : अवकाळीच्या तडाख्यातून वाचलेल्या आंब्याच्या कैऱ्या सध्या बाजारात डेरेदाखल झाल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात पन्हे आणि कैरी डाळ करण्यासाठी बाजारात दाखल झालेल्या कैऱ्या सामान्यांना भुरळ घालत आहेत. अनेक घरांमध्ये हा बेत संध्याकाळी तयार होत आहे.
चिमण्यांचे हाल
वडूज : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे चिमण्यांचे हाल होत आहेत. शहरात काही ठिकाणी भांड्यात पाणी ठेवून त्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते. लॉकडाऊनमुळे घरात असलेल्यांनी अंगणात आणि छतावर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, असे पर्यावरणप्रेमी सांगतात.
कलिंगडांना मागणी
फलटण : उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे सध्या बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या कलिंगडांना चांगलीच मागणी वाढली आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या कलिंगडांना मागणी अधिक आहे. महामार्गावरील हॉटेल बंद असल्यामुळे सध्या झाडाच्या सावलीला कलिंगड विक्री करणाऱ्यांना अच्छे दिवस आले आहेत.
आंबे अजूनही महागच
सातारा : ग्रामीण भागातून साताऱ्यात आंबे लॉकडाऊनमुळे विक्रीस येत नाहीत. त्यामुळे कोकणातून येणाऱ्या आंब्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, ते चांगलेच महाग असल्याने सर्वसामान्यांना घेण्यास परवडत नाही. सरासरी आठशे ते हजार रूपये डझन दराने त्याची विक्री सुरू आहे.
उन्हाळ्याचे विकार वाढले
वाई : दिवसेंदिवस सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे मोेठ्या व्यक्तींसह लहान मुलांना उन्हाळी विकार त्रासदायक ठरू लागले आहेत. कोविड काळात सर्दी, खोकला झाला तरी नागरिकांची घाबरगुंडी उडत आहे. दवाखान्यात जाण्यापेक्षा घरगुती उपायांवर लोक भर देत असल्याचे पाहायला मिळते.
\\\\\\\\
फोटो मेल केला आहे.
वणव्यात चारा जळाल्याने जनावरे ओढ्यात
सातारा : सातारा शहरालगत असलेल्या डोंगरांना वणवे लावून उपलब्ध चारा जाळून टाकला आहे. त्यामुळे आता जनावरांना खाण्यासाठी चाराही उपलब्ध नाही. साहजिकच शेतकऱ्यांना जनावरे ओढ्यात सोडावी लागत आहेत. वाहत्या सांडपाण्यामुळे उगवलेले गवत, झाडांचा पालापाचोळा ही जनावरे खात आहेत. गंमत म्हणून लावलेल्या वणव्यामुळे जनावरांना झळ सहन करावी लागत आहे.