वाई : ऐतिहासिक, सांकृतिक महत्त्व लाभलेली वाई येथील कृष्णानदी कचरामुक्त व जलपर्णीमुक्त करण्याचा निर्धार पालिका व स्वयंसेवी संघटनांनी केला आहे. स्वयंसेवकांकडून दर रविवारी कृष्णा घाटावर राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता मोहिमेमुळे नदीचे रुपडे बदलू लागले आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.सध्या वाढत्या प्रदूषणामुळे सर्वच नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. घाणीमुळे जीवनदायिनी असणाºया नद्या आता शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़ सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या वाई येथील कृष्णा नदीही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ही नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आता शहरातील स्वयंसेवी संघटना व पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.कृष्णानदी स्वच्छ सुंदर करण्याच्या जाणिवेतून वाई येथील सेवाकार्य समिती, नगरपालिका, व्यावसायिक, नोकरदार व पर्यावरणप्रेमींनी ‘एक दिवस कृष्णेसाठी’ हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत सर्व नागरिक दर रविवारी नदी स्वच्छतेसाठी एकत्र येत आहे.नुकतीच नदीपात्रात वाढलेली जलपर्णी तसेच झुडपे हटविण्यात आली असून, प्लास्टिक कचराची गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेमुळे नदीपात्राने मोकळा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे कृष्णा नदीवरील सर्व घाटांची स्वच्छता करण्यात आली असून, या चळवळीस लोकसहभागही वाढत आहे.
संडेला घाट... स्वच्छतेचा थाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 11:00 PM