शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सुरज निकमने दाखवले मारुती जाधवला आसमान

By admin | Published: April 15, 2017 12:33 PM

घिस्सा डावावर धूळ चारली : लोणीच्या मैदानात रंगला प्रेक्षणीय कुस्त्यांचा थरार

आॅनलाईन लोकमतऔंध जि. सातारा, दि. १५ : लोणी, ता. खटाव येथे झालेल्या कुस्ती मैदानात धुमछडी आखाड्याचा मल्ल सुरज निकम याने दहाव्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर कोल्हापुरच्या मारुती जाधव याला पराभूत करून एक लाख रुपये इनाम पटकावले. मैदानात इतर गटात झालेल्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थीतांची मने जिंकली.येथील श्रीहनुमान यात्रेनिमित्त ग्रामस्थांचे वतीने कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप विधाते, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, गोरख सरक माणिक पवार, जीवन कापले, विकास जाधव, मोहन कनवाळू, संभाजीराव फडतरे, कँ. शिवाजी निकम, जालींदर राऊत, शंकर रणनवरे, अमृत फडतरे, विश्वंभर रणनवरे योगेश फडतरे, घनश्याम काळे, राजेंर्द्र शिंदे, शरद शिंदे, रामचंद्र शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रथम क्रमांकाच्या लढतीत मारुती जाधव व सूरज निकम यांच्यात १० मिनिटे कुस्ती चालली. मैदानात सर्व प्रेक्षकांची ही कुस्ती पाहताना अभूतपूर्व शांतता होती. मारुती जाधव आक्रमक तर सुरज निकम शांतपणे लढत होता. समोरून झोळी बांधण्याचा मारुतीचा प्रयत्न अपयशी ठरवित सुरजने त्यांच्यावर ताबा घेउन पोकळ घिस्सा डावावर त्याला धूळ चारली. सुरजने कुस्ती जिंकताच मैदानात कुस्ती शौकिनांनी जल्लोष केला.मैदानात पंच म्हणून विकास जाधव, गणेश फडतरे, महेंद्र फडतरे, अर्जून पाटील, श्रीमंत फडतरे, श्रीनिवास शिंदे, बाबूराव साठे, अधिक जाधव यांनी काम पाहिले.स्पधेर्तील इतर विजेते

द्वितीय क्रमांकाची कुस्ती प्रशांत शिंदे जाखणगांव विरुद्ध अनिल जाधव पुणे ही कुस्ती बरोबरीत सुटली. तृतीय क्रमांकाच्या लढतीत सोन्या सोनटक्के (कोल्हापूर) याने पारगावच्या शरद पवार याला घुटना डावावर आसमान दाखवले. कोल्हापूर येथील सरदार सावंत याने गणेश कुनकुले (पुणे) याला बँक थ्रो डावावर चितपट करून उपस्थीतीतांची वाहवा मिळवली. तसेच मनोज कदम (नांदोशी), स्वप्नील पाटील (कोल्हापूर), दत्ता नरळे (सांगली), कनैय्या माने, नितीन उमापे, संग्राम सुर्यवंशी (लांडेवाडी), अक्षय देवकर, (लोणी), ऋषिकेश साठे (भोसरे) यांनी चटकदार कुस्त्या करुन उपस्थीतांची वाहवा मिळवली.