लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : खटाव तालुक्यातील नेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेश रामचंद्र चव्हाण, तर उपसरपंचपदी वैभव दत्तात्रय सुतार यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर श्री काशीविश्वेश्वर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
नेर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रकाश चव्हाण, रुपेश चव्हाण यांच्या श्री काशीविश्वेश्वर महाविकास आघाडीने ९ पैकी ६ जागा मिळवत सत्तांतर केले होते. संजय चव्हाण यांच्या साई दुर्गा पॅनेलला ३ जागांवर समाधान मानावे लागले होते.
नेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (दि. २७) दुपारी सरपंचपदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सरपंचपदासाठी सुरेश चव्हाण, तर उपसरपंच पदासाठी वैभव सुतार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकारी आर. एस. जगताप यांनी जाहीर केले. ग्रामविकास अधिकारी एस. आर. सणस यांनी निवड प्रक्रिया उत्तम प्रकारे हाताळली. यावेळी हेमलता गिरी, सुधाताई चव्हाण, संजीवनी चव्हाण, समीर चव्हाण हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी रुपेश चव्हाण, प्रकाश चव्हाण, हणमंत चव्हाण, चेअरमन संजय चव्हाण, विश्वास चव्हाण, उत्तम चव्हाण, शिवनाथ देशमुख आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान आमदार महेश शिंदे, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीरशेठ जाधव, बुधचे सरपंच अभय राजेघाडगे यांनी नवनिर्वाचितांचे कौतुक केले.
२८नेर
फोटो ओळ : नेर (ता. खटाव) नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्यांसमवेत, रुपेश चव्हाण, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.