शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सातारा नगराध्यक्षपदासाठी भाजपमधून सुवर्णा पाटील

By admin | Published: October 27, 2016 12:08 AM

‘रासप’ला तीन जागा : १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने बुधवारी रात्री १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, भाजपच्यावतीने नगरसेविका सुवर्णा पाटील यांच्या नावाची नगराध्यक्षपदासाठी घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाला तीन जागा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य दीपक पवार, दत्ताजी थोरात, सुनील काळेकर, सुवर्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.दीपक पवार म्हणाले, ‘इतर मित्र पक्ष सोबत आले नाहीत तर स्वबळावर ही निवडणूक लढविली जाईल. शिवसेना व रिपाइं यांना पुढील २४ तासांची डेडलाईन दिली आहे. सातारा शहराचा विकास आणि घराणेशाहीला विरोध, असा अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे. साताऱ्यात घराणेशाही असल्यामुळे विकास झाला नाही. अनेक विकासकामांना नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे खीळ बसली. याला घराणेशाही कारणीभूत आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घराण्यात अनेक वर्षे सत्ता आहे आणि आता त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांची नगराध्यक्षपदासाठी चर्चा आहे. म्हणजे पुन्हा घराणेशाही सुरू होणार. सातारा शहराच्या नगराध्यक्षपदासाठी दुसरी सक्षम सामान्य परिवारातील महिला नाही का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. सुवर्णा पाटील म्हणाल्या, ‘गेल्या पाच वर्षांत नागरिकांच्या पैशाने जी उधळपट्टी झाली, ती रोखण्याचा प्रयत्न आहे. सातारा विकास आघाडीमध्ये मी पाच वर्षे जरी काम केले तरी मी भाजप सदस्य म्हणूनच काम केले.’ (प्रतिनिधी)उमेदवारांची नावे प्रभाग १ प्रदीप मोरे, २ मिलिंद काकडे, ३ दीपक बर्गे, ५ योगेश जाधव, ७ जयश्री काळेकर, अशोक धडचिरे, ८ धीरज घाडगे, ९ विक्रम बोराटे, ११ आप्पा कोरे, १४ महेंद्र कदम, सरोज पवार, १५ सागर पावशे, १६ धनंजय जांभळे, प्राची शहाणे, १७ विजय काटवटे, सिद्धी पवार, १८ संजय लेवे व प्रभाग १९ व २० मध्ये राष्ट्रीय समाज पक्षासाठी तीन जागा देण्यात आल्या आहेत.