खंडाळा : खासदार श्रीनिवास पाटील फाउंडेशन व आयुका पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या सातारा जिल्हा आंतरशालेय डिजिटल सायन्स प्रोजेक्ट स्पर्धेत नायगाव (ता. खंडाळा) येथील सुयश ननावरे याने द्वितीय कमांक मिळवून ‘सातारा आइनस्टाइन अॅवॉर्ड’ वर नाव कोरले.
नायगाव येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयात सुयश चंद्रकांत ननावरे हा नववीमध्ये शिक्षण घेत आहे. पुणे येथील आयुका संस्थेच्या माध्यमातून खासदार श्रीनिवास पाटील फाउंडेशनने ही स्पर्धा विविध शालेय गटात घेतली होती. सुयशने नववीच्या गटात वैज्ञानिक प्रकल्प सादर करून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला. यासाठी त्याला विज्ञान शिक्षक दत्तात्रय रासकर यांनी मार्गदर्शन केले. या संस्थेच्या वतीने सातारा आईनस्टाईन अॅवॉर्ड देऊन त्याला सन्मानित करण्यात आले.
त्याच्या या यशाबद्दल सभापती राजेंद्र तांबे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, गटशिक्षणाधिकारी सुजाता जाधव, प्राचार्य नंदकुमार कोकरे यांनी कौतुक केले.
..................... .....................
फोटो मेल केला आहे.