सातारा : किल्ले अजिंक्यताºयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले होते. राजसदरही सजवण्यात आली होती. सकाळच्या गार वाºयाला राजसदरेवर मंजुळ सनईच्या सुरात स्वाभिमान दिवसाच्या कार्यक्रमाला आणखी रंगत आणली गेली. उपस्थित मान्यवरांना भगवे पेठे परिधान केल्याने सगळीकडे भगवामय वातावरण झाले होते.
हिंदुस्थानच्या इतिहासात सर्वात मोठा राज्यविस्तार झाला तो म्हणजे मराठ्यांचे झेंडे अटकेपार फडकले. हाच आदेश किल्ले अजिंक्यताºयावरून देण्यात आला. राजधानी साताºयाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपूत्र शाहू महाराज यांचा राज्यभिषेक झाला तो म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस. १२ जानेवारीला सातारा स्वाभिमान दिनाचे महत्त्व आहे. स्वाभिमान दिवस सोहळ्याचे निमित्ताने ही एक चळवळ सुरू राहावी, हा उद्देश ठेवून राजसदरेवर कायमस्वरूपी प्रतिमा ठेवण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
या स्वाभिमान दिन सोहळ्यास प्रा. के. एन. देसाई, अजय जाधवराव, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, विजय काळोखे, हेमंत गुजर, उद्योजक कन्हैय्यालाल राजपुरोहित, बी. एन. केवटे, युवराज पवार, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड, शरद पवार, मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, मनसेचे सातारा शहर प्रमुख राहुल पवार, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिजित बारटक्के यांच्यासह अनेक मावळे उपस्थित होते.
यावेळी प्रा. के. एन.देसाई म्हणाले, ‘शाहू महाराजांची कारकीर्द कशी झाली?, सर्व संपले असताना अटकेपार झेंडे रोवले हे माहिती पडले पाहिजे.इतिहासाचा आंधळा अभिमान शाप आहे. घोर अज्ञान हा एक गुन्हा आहे. त्याकरिता वाचन केल्याने तो गुन्हा दूर होतो. कोट्यवधी कागदपत्रे वाचनाविना पडून आहेत. जो समाज भूतकाळ विसरतो त्यास भविष्य उज्ज्वल नसते. होणारी अधोगती टाळता येत नाही, असे सांगत ते म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराज यांचीही ससेहोलपट झाली होती. औरंगजेबाने हाल करून त्यांना मारल्यानंतर झुल्फीकार खानाने रायगडाला वेढा दिला होता. त्याचवेळी येसूबार्इंनी राजाराम महाराजांना जिंजीला पाठवलं. रायगड खानाने घेतला. साडेसहा वर्षे किल्ला मराठ्यांनी लढवला होता. मराठे रसदमध्येच हाणत होते.
पेशव्यांनी किल्ले अजिंक्यताºयावरून वस्त्र नेलीत. शाहू महाराजांचा राज्यभिषेक १२ जानेवारी १७०८ रोजी झाला. त्यांनी वतन दिली. १७१३ मध्ये पेशवे पद दिले. पेशव्यांना कर्ज कोण देत नव्हते. सावकारांकडे राव रंभा निंबाळकर गेले तेव्हा कर्ज दिलं. त्यांनी तेथे तारण म्हणून मिशी दिली. जाणत्याच्या हातात सूत्रे दिली. साताºयाच्या गादीचे कर्तृत्व मोठे आहे. पिकनिकचं ठिकाण नाही तर नतमस्तक होण्याची ठिकाण हे नागरिकांनी जाणलं पाहिजे.’
दीपक प्रभावळकर म्हणाले, ‘किल्ले अजिंक्यताºयाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गेली तीन वर्षे सातारा पालिकेला विनंती करूनही पालिका एक विशेष सभा स्वाभिमान दिनावेळी राजसदरेवर घेत नाही. गेली आठ वर्र्षे हा कार्यक्रम होत आहे. ही एक चळवळ आहे. दीर्घकालीन हा कार्यक्रम व्हावा म्हणून हळूहळू सुरुवात होत आहे. हिंदुस्थानाला मोठा इतिहास आहे. अटकेपार झेंडे फडकवले गेले ते याच राजसदरेवरून दिलेल्या आदेशावरून साताºयाचा अभिमान हा असला पाहिजे. शहरात हा स्वाभिमान दिन साजरा झाला पाहिजे, असे सांगत सातारा पंचायत समितीची मासिक सभा पुढच्या वर्षी राजसदरेवर होईल, स्वाभिमान दिवस साजरा होईल,’ असे त्यांनी सांगितले.भोसले घराण्यातील सर्वांची पावले लागलीइतिहासातील एकमेव अजिंक्यतारा किल्ला आहे. जेथे भोसले घराण्यातील सर्वांचे पावले लागली आहेत. १६६३ मध्ये शहाजीराजे या किल्लावर आले होते. शिवाजी महाराज आजारपणाच्या काळात राहिले होते. शाहू महाराजांनी तर राजधानीच जाहीर केली. भोसले कुळाचा इतिहास केवळ ढाल-तलवारीपुरताच मर्यादित नाही. तर मातृभक्तीचा इतिहास आहे, असे मत इतिहास तज्ज्ञ अजय जाधवराव यांनी व्यक्त केले.
उत्साह वाखाण्यजोगाकिल्ले अजिंक्यताºयावर स्वाभिमान दिनाच्या कार्यक्रमाला युवकांची संख्या लक्षणीय होती. पहाटे सहा वाजल्यापासून युवक किल्ल्यावर येत होते. त्यामध्ये युवतींचाही सहभाग होता. सकाळच्या सुमारास गडावर सनईचा सूर ऐकून मावळ्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचत होता.वयोवृद्धांना पाणी वाटपस्वाभिमान दिनाला गडावर चालत आलेल्या काही वयोवृद्धांना धाप लागली होती. अशा वृद्धांना मावळ्यांकडून पाणी दिले जात होते. एवढेच नव्हे तर त्यांना हात देऊन गडावर येण्यास मदत केली जात होती. या कार्यक्रमाला परजिल्ह्यातूनही नागरिक उपस्थित होते.सातारा येथे शनिवारी किल्ले अजिंक्यताºयावर स्वाभिमान दिनानिमित्त प्रा. के. एन. देसाई, अजय जाधवराव, कन्हैय्यालाल राजपुरोहित, दीपक प्रभावळकर, सुदामदादा गायकवाड, राहुल पवार, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे उपस्थित होते.