शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

कऱ्हाडात 'स्वाभिमानी'चे गाडी ढकलो आंदोलन, इंधन दरवाढीचा निषेध : प्रशासनास निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:43 PM

इंधन दरवाढ करून अच्छे दिन दाखवल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी दुपारी कऱ्हाडात टाऊन हॉल परिसर ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पायी दुचाकी गाडी ढकलून निषेध आंदोलन केले.

ठळक मुद्देकऱ्हाडात 'स्वाभिमानी'चे गाडी ढकलो आंदोलन इंधन दरवाढीचा निषेध : प्रशासनास निवेदन

कऱ्हाड : इंधन दरवाढ करून अच्छे दिन दाखवल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी दुपारी कऱ्हाडात टाऊन हॉल परिसर ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पायी दुचाकी गाडी ढकलून निषेध आंदोलन केले.

सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ केल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या राज्य व केंद्र सरकारला आपल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पायी दुचाकी गाडी ढकलून निषेध आंदोलन केले.यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिलबापू घराळ, सुभाष नलवडे, योगेश झांबरे, रोहित पाटील, विनायक जाधव, रामचंद्र बोराटे, तुषार साळुंखे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन नलवडे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले.इंधन दरवाढ विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथून एसटी बसस्थानक परिसर ते दत्त चौकपासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी गाडी ढकलो आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारचा निषेध असो, कुठे गेले अच्छे दिन, अशा घोषणा दिल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPetrolपेट्रोल