वाठार, ता. कराड येथील वीज वितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबत निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना दिलेल्या वीजबिलाबाबत समाधान होत नाही. मीटरप्रमाणे वीजबिल योग्य आकारणी होत नाही; ज्यांची मीटर पूरपरिस्थितीमध्ये अजून बदलून दिलेली नाहीत किंवा मीटर नादुरुस्त असताना विद्युत वितरण कंपनीचे मनमानीप्रमाणे तीन महिन्यांचे ठराविक रीडिंग धरून बिल दिले आहे, अशा ग्राहकांना आपण त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ द्यावा.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. शेतीतील उभे पीक वाळून जाण्याची भीती आहे. ज्या पिकाला शेतकरी वर्षभर जपतो या पिकाचे जर आपल्या वीजजोडणीमुळे नुकसान झाले, तर आपली विद्युत वितरण कंपनीस जबाबदार धरले जाईल. वरील सर्व बाबींचा विचार करून वीज वितरण कंपनीने शेतीपंप ग्राहक यांना दिलासा द्यावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व शेतीपंप व ग्राहक यांना घेऊन कोणत्याही क्षणी आंदोलन करणार आहे.