लोकमत न्यूज नेटवर्कसातारा: सातारा हिल मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी येथील भूविकास बँक परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाच्या सुशोभीकरणावरून काही कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात आंदोलन केले तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सातारा हिल मॅरेथॉन आयोजकांनी उभारलेल्या नामफलक काढून टाकण्याचा प्रयत्न केला. अखेर खासदार उदयनराजेंनी मध्यस्थीनंतर सुभाषचंद्र बोस चौकातील मॅरेथॉनच्या संयोजकांनी लावलेले फलक व अक्षरे हटविण्यात आली.
सातारा शहरात मॅरेथॉन आयोजकांकडून ठिकठिकाणी डागडुजी आणि सुशोभीकरण सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मॅरेथॉन आयोजकांनी हुतात्मा स्मारकासमोर सुभाषचंद्र बोस चौकात मॅरेथॉनचे सहप्रायोजक असलेले फलक लावले. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी याच्या निषेधार्थ उपोषण सुरू केले होते. यावेळी शिवाजी राऊत, प्रा. विक्रांत पावर, अस्मल तडसरकर, विजय मांडके, चंद्रकांत खंडाईत, विजय निकम उपस्थित होते.
दरम्यान, या चौकात उभारलेल्या आयलँडवरील सातारा हिल मॅरेथॉनची अक्षरे काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. उपविभागीय पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न केले. मॅरेथॉनचे आयोजक आल्यानंतर आंदोलकांनी आयलँडवर सुभाषचंद्र बोस यांचे नाव असावे. इतर खासगी कंपनी किंवा स्पर्धेचे नाव असू नये, अशी मागणी केली. दोन्ही गटांच्या भूमिकेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी तेथे येऊन मध्यस्थी करत तोडगा काढला. त्यानंतर आयोजकांनी त्या ठिकाणी असलेली मॅरेथॉनची नावे काढली. त्यामुळे वादावर पडदा पडला. यावेळी सुनील काळेकर, सागर भोगावकर, नरेंद्र पाटील उपस्थित होते.साताºयाचं वैभव बदनाम करण्याचा विघ्नसंतुष्टी मंडळींचा प्रयत्न : काटेलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : हुतात्मा उद्यानाजवळील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असे होते व असेच कायम राहील. आम्ही केवळ या चौकाचे सुशोभीकरण केले. सातारकरांचा मानबिंदू असलेल्या मॅरेथॉनविषयी देखावा व सजावट केली. या वास्तूमुळे साताºयाच्या वैभवात भर पाडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मात्र दरवर्षी मॅरेथॉनजवळ आल्यावर यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करणारी काही मंडळी या सर्व कारस्थानामागे आहेत, असा आरोप मॅरेथॉन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे यांनी दिली.
या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून चौकाच्या मध्यभागी असलेल्या लाईटच्या खांबावर ‘नेताजी सुभाषचंद्र बोस चौक’ अशी केवळ एक छोटीशी पाटी होती. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन चांगले होण्याच्या दृष्टीने एक बेट व त्या चौकामध्ये येणाºया तीन प्रमुख रस्त्यांच्या मुखापाशी तीन छोटी त्रिकोणी बेटे विकसित करण्यास सुरुवात केली.दि. १७ सप्टेंबर रोजी होणाºया सातारा हिल मॅरेथॉनसाठी देशाच्या व जगाच्या कानाकोपºयातून साताºयात दाखल होणाºया हजारो स्पर्धकांचे स्वागत करण्याच्या हेतूने वेळेत हे काम पूर्ण करण्यासाठी असोसिएशनचे सदस्य व अनेक सातारकर नागरिक दिवस रात्र झटून काम करीत आहेत.सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकांच्या भावनांना हात घालून मॅरेथॉन संयोजकांना अडचणीत आणण्याचा खटाटोप केला जातोय. दरवर्षी मॅरेथॉनजवळ आल्यावर यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करणारी काही मंडळी या सर्व कारस्थानामागे आहे, याची आम्हाला जाणीव आहे, असेही ते म्हणाले.