शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

वडूजचा स्वराज चव्हाण शिष्यवृत्तीत राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2022 4:05 PM

सातारा : महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वडूजच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलचा ...

सातारा : महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वडूजच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी स्वराज चव्हाण याने शहरी विभागातून प्रथम, तर ग्रामीण विभागातून सिद्धी गंगित्रे हिने सहावा क्रमांक पटकावला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दहिवडी विद्यालयाच्या अनुजा यादव हिने राज्याच्या गुणवत्ता यादीत तिसरा, तर साताऱ्यातील शर्वरी पाटणे हिने शहरी भागातून राज्यातील गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक पटकावला. वडूजच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या वतीने १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ३ लाख ३७ हजार ३७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातील ५७ हजार ३३४ विद्यार्थी पात्र झाले. यापैकी १४ हजार २५० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील २ लाख १० हजार ३३८ विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्यापैकी २३ हजार ९६२ विद्यार्थी पात्र झाले असून, १० हजार ७३६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल २४ नोव्हेंबर, २०२१ रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र, २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर, २०२१ या कालावधीत गुण पडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाइन मागविण्यात आले होते. परिषदेकडे विहीत मुदतीत ऑनलाइन आलेल्या परिपूर्ण अर्जांवरून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी करून, गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला.जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांनी मिळविले राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान...पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातून शर्वरी पाटणे गुरुकुल स्कूल, साहिल लाडे जागृती विद्यामंदिर बनवडी, ज्योती गरवारे निळेश्वर माध्यमिक विद्यालय, मानसी पवार श्री मुधाईदेवी विद्यामंदिर देऊर, साहिल कदम इंग्लिश मीडियम स्कूल नाडे, मोहिनी शिरसाट झेडपी शाळा कोडोली.शहरी विभागातून अनुजा यादव पीएम शिंदे कन्या विद्यालय दहिवडी, सारंग गुजर महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा, आकांक्षा गोमटे अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा, प्रणव काळे अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा, रूहान मणेर मलकापूर, तृप्ती जाधव छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज, श्रेयस बुवा अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा, ऐश्वर्या शिंदे नूतन मराठी शाळा आगाशिवनगर, पीयूष दुरगुडे द्रविड हायस्कूल वाई, वैष्णवी संकपाळ माने देशमुख विद्यालय.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती शहरी विभागातून स्वराज चव्हाण छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज, आदिती तिडके हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज, अद्विका जाधव छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज, संस्कृती देशमुख छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज, अनिरुद्ध गळवे सयाजीराव विद्यालय सातारा, वैष्णवी येवले महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा, अर्जुन शिंदे महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा, भार्गवी चांदोली विद्यानगर फलटण, रमण रंगरेझ न्यू इंग्लिश स्कूल सातारा, पार्थ पाटील छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज, अवनीश क्षीरसागर लोणंद,ओवी माने सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल कोरेगाव, ओमकार भुजबळ महात्मा गांधी विद्यालय दहिवडी, स्वामी क्षीरसागर वाई पालिका शाळा नंबर ५, प्रणाली निकम छत्रपती शिवाजी हायस्कूल, श्रुती चिकणे झेडपी शाळा मेढा, आर्यन सुतार छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज, राजवीर भुंजे नगरपालिका शाळा नंबर ३ सातारा, तनिष्का जाधव छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज, अक्षय पोद्दार मुधोजी हायस्कूल देऊर, श्रेयस कुंभार झेडपी शाळा मेढा.ग्रामीण विभागातून सिद्धी गंगीत्रे पुनर्वसित माजरी, सुयश पाटील झेडपी शाळा सर्कलवाडी, आर्या पवार झेडपी शाळा बामणवाडी, अथर्व राहुरकर झेडपी शाळा तापोळा, कार्तिकी गोळे, चैतन्य धायगुडे झेडपी शाळा बोरी, जयवर्धन भोईटे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, गायत्री शिंदे झेडपी शाळा कोपर्डे, वेदांत जाधव झेडपी शाळा तापोळा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा