औंध : ‘या भूमीत नरवीरांच्या महान पराक्रमामुळेच शिवछत्रपतींचे स्वराज्य घडले,’ असे मत वडूज मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष देशमुख यांनी केले.
खटाव तालुक्यातील चौकीचा आंबा येथे अखिल भारतीय जीवा सेना, आलुतेदार-बलुतेदार संघटनेच्यावतीने स्वराज्य रक्षणासाठी साक्षात मृत्यूला सामोरे गेलेले वीर शिवाजी काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, वीर शंभूसिंह जाधव तसेच नटश्रेष्ठ निळूभाऊ यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालक शिवाजीराव जाधव, हिंदकेसरी विकास तात्या जाधव, भीमराव जाधव, सुभाष जाधव, मुख्याध्यापक हणमंत पवार, संतोष चव्हाण, संयोजक सोमनाथ काळे, सतीश डोंगरे, दत्ता कोळी, शरद कदम, पंकज कदम, अजित वाघ, संतोष मोरे, संभाजी देवकर उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, ‘पराक्रमी वीरांचा स्मृतिदिन साजरा केल्यामुळे त्यांच्या त्यागाचे स्मरण नवीन पिढीस होण्यास मदत होणार आहे. आजकाल कोणत्याही संघटनेत समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते कमी होत आहेत.’
धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सोमनाथ काळे यांनी आभार मानले.
१४औंध
फोटो : चौकीचा आंबा येथे कार्यक्रमप्रसंगी डॉ. संतोष देशमुख, शिवाजी जाधव, पै. विकासतात्या जाधव, सोमनाथ काळे उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)