लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘पती कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी सैन्यात भरती होण्याचा निश्चय केला होता. पंधरा दिवसांपूर्वीच त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. स्वाती महाडिक म्हणजे देशभक्तीचं अनोखं रूप आहे,’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्यासह निधी दुबे यांच्या धैर्य आणि धाडसाचा मोदींनी दाखला दिला. ते म्हणाले, ‘कर्नल स्वाती महाडिक आणि निधी दुबे या दोन्ही महिलांनी देशभक्ती आणि महिला शक्तीचं अनोखं रूप सर्व देशवासियांना दाखवून दिलं आहे.जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना, सह्याद्रीचा वीरपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात ते धारातीर्थी पडले. १७ नोव्हेंबर २०१५ रोजी साताºयाचा हा जवान शहीद झाला. या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही देण्यात आला होता.पतीच्या अंत्यसंस्कारावेळी पत्नी स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुलं आर्मीतच जातील, असा निर्धार केला होता. आज खरोखरच त्यांनी देशसेवेचे घेतलेले व्रत पूर्ण केले असून, त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तितके कमीच आहे,’ असेही पंतप्रधान मोदीम्हणाले.
‘मन की बात’मध्ये स्वाती महाडिकांचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:15 AM