शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

कल्पकतेने बनविले वठलेल्या झाडास शिक्षा अभियानाचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:38 AM

वाई : वाई येथील द्रविड हायस्कूलच्या आवारातील वठलेल्या झाडातून पेन्सिलची प्रतिकृती मुख्याध्यापक नागेश मोने यांच्या भन्नाट डोक्यातून ...

वाई : वाई येथील द्रविड हायस्कूलच्या आवारातील वठलेल्या झाडातून पेन्सिलची प्रतिकृती मुख्याध्यापक नागेश मोने यांच्या भन्नाट डोक्यातून प्रत्यक्षात उतरली. ही पेन्सिल सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

‘चलो शिक्षा अभियानाची’ खूण असलेली ही पेन्सिल. परंतु एका वठलेल्या झाडातून तिची सुंदर प्रतिकृती तयार होईल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. कारण एरवी वठलेले झाड म्हटले की ते तोडायचे आणि त्याचा वापर चुलीसाठी, बंब पेटविण्यासाठी करायचा एवढेच माहीत. परंतु द्रविड हायस्कूल नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम राबवित असते. शाळेच्या आवारात असलेले हे झाड तोडून टाकण्यापेक्षा त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे काही तरी घडविण्याची कल्पना नागेश मोने यांना आली आणि त्यातूनच ही पेन्सिलची सुंदर प्रतिकृती उदयास आली. ही पेन्सिलची प्रतिकृती शाळेच्या आवारात शोभून दिसत आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांनाही प्रेरणा मिळेल की वठलेल्या झाडातूनही काहीतरी निर्माण होऊ शकते, अशी कल्पकता वाढीस लागावी असाही उद्देश यामागे आहे. उपक्रमास विद्यालयातील शिक्षकांचेही सहकार्य लाभले.

कोट...

वठलेल्या झाडाचा काहीतरी विधायक उपयोग करण्याच्या हेतूने शैक्षणिक साधन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. समग्र शिक्षण अभियानात पेन्सिल हे शिक्षणाचे, प्रगतीचे प्रतीक मानले जाते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली ही पेन्सिल विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारी ठरत आहे.

- नागेश मोने, मुख्याध्यापक, द्रविड हायस्कूल वाई

फोटो आहे...

२५वाई

वाई येथील द्रविड हायस्कूलच्या आवारातील वठलेल्या झाडातून पेन्सिलची प्रतिकृती सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (छाया: पांडुरंग भिलारे)