सातारा : राज्यभरातील हौसी पर्यटकांना कासच्या फुलांचे वेध लागले आहेत. त्यांची पावले कासच्या दिशेने वळत आहेत. एका दिवसात रविवारी तब्बल दीड हजार पर्यटकांनी भेट दिली. याच काळा सातारा-कास मार्गावर वाहन चालविण्याचा परवाना तसेच हुल्लडबाज करणाऱ्या १३ वाहनचालकांवर सातारा तालुका पोलिसांनी रविवारी कारवाई केली. जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश झालेल्या कासवर आॅगस्टपासून फुलांचा बहर सुरू होते. चौथा शनिवार व रविवारी अशा सलग सुट्या आल्याने कास आणि बामणोलीला पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पोलिसांनी पेट्री आणि सज्जनगड रस्त्यावर तपासणी केंद्र ेउभारली होती. प्रत्येक वाहन कसून तपासणी करून सोडण्यात येत होते. यावेळी काही वाहनचालकांकडे परवाना नव्हता, तर काहीजण रस्त्यात गाडी उभी करून दंगा करीत होते. अशा पर्यटकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १,३०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला. (प्रतिनिधी)