खटावमधील शेतकऱ्यांना नेर तलावातील पाणी येरळा नदीत व दोन्ही कॅनॉलला सोडताना येत असलेल्या अडचणी आणि पाटबंधारे विभागापुढील समस्या याबाबत खाडे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, अशोक कुदळे, किसन मोरे, उमेश भिसे, रमेश शिंदे, चरण बोबडे, दीपक घाडगे, कालवा निरीक्षक अमोल लेंभे, कालवा निरीक्षक शकील पठाण आदींसह नदीकाठचे सर्व विहीर, बोअरमालक उपस्थित होते.
राहुल पाटील म्हणाले, वेळेत पाणी सोडण्याचे नियोजन नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. शेतकऱ्यांना पाणीसारा भरूनही पाणी मिळाले नसल्यामुळे शेतकरी पाणीसारा भरावयास तयार नाहीत. पाटबंधारे विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताळमेळ व समन्वय नसल्यामुळे पाणी वाटपाचे योग्य ते नियोजन होत नाही. पाणी वाटप संस्था स्थापन करून शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाटप करावे. शासनाच्या धोरणानुसार कालवा दुरुस्तीचे तसेच बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव दिले आहेत. जर सिंचन प्रकल्पात असलेल्या लाभार्थ्यांकडून महसूल गोळा होत नसेल, तर दुरुस्ती खर्च करताना अडचणी येतात. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार पाणीसारा रूपात महसूल जमा करणे बंधनकारक असल्याचे खाडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी पाणीसारा भरण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे मत उमेश भिसे यांनी व्यक्त केले.
फोटो ओळ :
नेर तलावातील पाणी डाव्या कालव्यात व नदीपात्रात सोडण्याबाबत झालेल्या बैठकीत बोलताना उपविभागीय अभियंता खाडे, सरपंच नंदकुमार वायदंडे, राहुल पाटील आदी.