पावसाळ्यात पुरातून वाट काढत रुग्णांचा जीवघेणा प्रवास; दुर्लक्षाचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : तालुक्यातील परळी खोºयामध्ये अत्यंत दुर्गम भाग म्हणून समजल्या जाणाºया सांडवलीमधील ग्रामस्थांना आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. ना रस्ता ना वाट, अशा परिस्थितीतही येथील ग्रामस्थ तब्बल बारा किलोमीटर पायपीट करून आजारी व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवत आहेत. हे विदारक चित्र पाहून प्रशासनाला जाग कशी येत नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.सांडवलीपासून पांगारीपर्यंत नागरिकांना चालत यावे लागते. दहा ते बारा किलोमीटरचे हे अंतर पार करताना येथील ग्रामस्थांचा जीव कासावीस होत असतो. एवढेच नव्हे तर रात्री-अपरात्री एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी ग्रामस्थांना जिवाचे रान करावे लागत आहे. पाठीवर डोली करून रुग्णाला बसविले जाते. त्यानंतर या डोलीतून संबंधित रुग्णाला कसेबसे रुग्णालयात पोहोचविले जाते. एका रुग्णाला पोहोचविण्यासाठी कमीत कमी सहा लोकांची गरज भासत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज कोणाला तरी या ओढ्यातून वाट काढत पांगारीपर्यंत आणावे लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.दोन तास आजारी व्यक्ती पाठीवरसांडवलीपासून पांगारीपर्यंत चालत येण्यासाठी दोन तास लागतात. आजारी व्यक्तीला पाठीवर घेऊन येथील गावकºयांना रुग्णालयात यावे लागते. तब्बल दोन तास आजारी व्यक्ती पाठीवर असल्यामुळे अनेकांना पाठदुखीचे त्रासही सुरू झाले आहेत. असे असतानाही एक माणुसकी म्हणून लोक एकमेकांना सहकार्य करत आहेत. परंतु अशा हालअपेष्टा अजून किती दिवस सुरू राहणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने उन्हाळ्यामध्येच या परिसरातील रस्त्यावर पूल आणि डांबरीकरण करणे आवश्यक आहे. तरच पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टळेल.गावच्या बाजूने पाणीच पाणीसांडवलीला जाण्यासाठी मोठी कसरत करावे लागते. पांगारी गावापर्यंत एकही वाहन गावाला जात नाही. कारण गावच्या दोन्ही बाजूंने मोठाले ओढे आहेत. हे ओढे पावसाळ्यात तुडुंब भरून वाहत असतात. अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून ओढ्यातून रस्ता पार करत रुग्णालयात वेळेत रुग्णाला पोहोचवावे लागते. त्यातच रस्त्याची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मोठाले खड्डे आणि खचलेला रस्ता, अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावकºयांना नेमके कसे जगावे, असा प्रश्न पडला आहे. प्रशासनाकडूनही या गावात कसल्याच सुविधा देण्यात आल्या नाहीत.अचानक पूर आला तर.सांडवलीहून पांगारीला येताना दोन्ही बाजुंनी ओढे आहेत. पावसाळ्यात या ओढ्यांना पूर येत असतो. तर कधी पाणी कमी असल्याने गावकरी ओढ्यातून मार्ग काढत पांगारीपर्यंत पोहोचतात. परंतु या ओढ्यातून जात असताना अचानक पूर आला तर. या विचाराने गावकºयांच्या मनात धडकी भरते. वर्षानुवर्षे सांडवलीचे गावकरी या संकटाचा सामना करत आहेत. मात्र, तरीही प्रशासन गप्प का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यंदाचा पावसाळा संपल्यानंतर तरी रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
रुग्णाला पाठीवर घेऊन कैक मैल पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 10:55 PM
पेट्री : तालुक्यातील परळी खोºयामध्ये अत्यंत दुर्गम भाग म्हणून समजल्या जाणाºया सांडवलीमधील ग्रामस्थांना आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. ना रस्ता ना वाट, अशा परिस्थितीतही येथील ग्रामस्थ तब्बल बारा किलोमीटर पायपीट करून आजारी व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवत आहेत
ठळक मुद्दे♦सांडवलीला ना रस्ता ना पायवाट♦गावकºयांना नेमके कसे जगावे, असा प्रश्न पडला आहे♦अशा हालअपेष्टा अजून किती दिवस सुरू राहणार♦प्रशासनाकडूनही या गावात कसल्याच सुविधा देण्यात आल्या नाहीत