शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

धोका पत्करू, पण रस्त्यावरच बसू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:25 AM

सातारा : शहरात बसस्थानकासमोरील रस्त्यावर भरणारी मंडई सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनली आहे. पालिका प्रशासनाकडून धोक्याची कल्पना देऊनही भाजी ...

सातारा : शहरात बसस्थानकासमोरील रस्त्यावर भरणारी मंडई सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनली आहे. पालिका प्रशासनाकडून धोक्याची कल्पना देऊनही भाजी विक्रेते रस्त्यावरून हालण्यास तयार नाही. या विक्रेत्यांना जीवापेक्षा ग्राहक अधिक महत्त्वाचा वाटत असल्याने एखादी विपरीत घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न अनेकांपुढे पडला आहे.

सातारा शहरात चार प्रशस्त भाजी मंडई आहेत. मात्र मंडईपेक्षा रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या बाजार समिती, राधिका रस्ता, खंडोबाचा माळ व मार्केट यार्डसमोर रस्त्यावर भरणारी मंडई चर्चेचा व चिंतेचा विषय ठरली आहे. मार्केट यार्डची जागा मोकळी असताना देखील दीडेशहून अधिक भाजी विक्रेते दररोज सकाळी रस्त्याकडेला मंडई थाटतात. राधिका रस्ता व खंडोबाचा माळ मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मंडई भरलेली असते. तर बाजार समिती व मार्केट यार्डच्या समोर रस्त्याच्या एका बाजूला विक्रेते भाजी विक्री करतात.

वाहतुकीचा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावरून मालवाहू तसेच इतर वाहनांची सातत्याने येजा सुरू असते. खरेदीसाठी येणारे ग्राहकही रस्त्याकडेला आपली वाहने उभी करत असतात. त्यामुळे हा मार्ग गर्दीने गजबजून जातो. पोवई नाक्याहून बसस्थानकाकडे जाणारा मार्ग तीव्र उताराचा व वळणाचा आहे. चालकांना बसस्थानकाकडे जाताना वाहनांच्या वेगावर आवर घालता येत नाही. हा धोका पत्करूनही भाजी विक्रेत्यांना रस्त्याकडेला बसणे सोयीचे वाटते. पालिका प्रशासनाने धोक्याची कल्पना देऊनही काही विक्रेते मार्केट यार्डच्या मोकळ्या जागेत जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता प्रशासनालाच ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

(चौकट)

म्हणे ग्राहक येत नाही...

रस्त्यावर बसून भाजी विक्री केल्यास ग्राहक येता जाता सहज भाजी खरेदी करतात. बाजार समितीच्या पटांगणावर बसल्यास ग्राहक आत फिरकत देखील नाहीत. अशी धारणा भाजी विक्रेत्यांची झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर बसून भाजी विक्री करणेच त्यांना सोयीचे वाटते.

(चौकट)

येथे होऊ शकते व्यवस्था

बसस्थानकासमोर भरणाऱ्या भाजी मंडईसाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत शेतकऱ्यांना कायमस्वरूपी जागा प्रशाससनाला देता आली नाही. सेव्हन स्टार इमारतीच्या समोर असलेली मोकळी जागा अथवा बसस्थानकासमोरील गाळ्यांच्या मागील बाजूस असलेल्या पार्किंगमध्ये भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर केल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.

(कोट)

रस्त्यावर बसून भाजी विक्री करणे धोक्याचेच आहे. विक्रेत्यांचा हा निष्काळजीपणा त्यांच्याच जिवावर बेतू शकतो. पालिका प्रशासनाने या विक्रेत्यांचे इतरत्र स्थलांतर करावे.

- निशांत पवार, सातारा

(पॉइंटर)

१५८ - भाजी विक्रेते

२८ - फळविक्रेते

फोटो : ०८ जावेद खान ०१

साताऱ्यातील बाजार समिती व मार्केट यार्ड समोर दररोज सकाळी रस्त्यावर मंडई थाटली जाते. (छाया : जावेद खान)