शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे, साताऱ्यात काँग्रेसचे पोवई नाक्यावर आंदोलन 

By नितीन काळेल | Published: January 19, 2024 3:13 PM

सातारा : तलाठी भरतीची चाैकशी एसआयटीमार्फत करण्यात यावी तसेच तसेच येथून पुढील भरती ही राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात ...

सातारा : तलाठी भरतीची चाैकशी एसआयटीमार्फत करण्यात यावी तसेच तसेच येथून पुढील भरती ही राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात यावी अशी घोषणाबाजी करत युवक काॅंग्रेसच्या वतीने पोवई नाक्यावर आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी राज्य शासनाचा निषेधही करण्यात आला.युवक काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एहसान खान, प्रदेश सरचिटणीस जयदीप शिंदे, तारीक बागवान, जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, जिल्हा प्रभारी अमोल दाैडकर, उपाध्यक्ष अमित जाधव, प्रदेश सचिव प्राची ताकतोडे, अमोल शिंदे, नरेंद्र पाटणकर, भूषण देशमुख, देवदास माने, शहानूर देसाई, अरबाज शेख आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.युवक राष्ट्राचा कणा असतो हे सत्य नाही तर केवळ घोषणेचे वाक्य आहे असा समज करुन घेऊन राज्यातील सरकार काम करत आहे, असे खेदाने म्हणावे लागत आहे. कारण, युवकांच्या भविष्याशी खेळून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे. असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्राचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातच आता नेहमीप्रमाणे तलाठी भरतीची परीक्षा खासगी कंपनीकडून पार पडली.यावेळीही पेपरफुटी आणि परीक्षेत गैरव्यवहाराच्या प्रकाराला सामोरे जावे लागले. या परीक्षेत २०० पैकी २१४ गुण मिळाल्याचे पुरावे मिळूनही भाजप प्रणित राज्य शासन परीक्षेत सावळा गोंधळ झाल्याचे मान्य करत नाही. याचा आम्ही निषेध करतो, असे युवक काॅंग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसagitationआंदोलन