ढेबेवाडी विभागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मंद्रुळकोळेची ओळख आहे. या ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र मोठे असून ते अनेक प्रभागात विखुरलेले आहे. या सर्वांचा समतोल साधत सरपंच अमोल पाटील यांनी प्रत्येक प्रभागात जाऊन तेथील ग्रामस्थांच्या अडचणी सोडवल्या. मात्र, काही ग्रामस्थांनी कर भरला नाही. वारंवार सूचना देऊनही त्यांनी कर भरला नाही. त्यामुळे पाटण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप कुंभार, टी.टी. थोरात, सरपंच अमोल पाटील, ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली. मोहीम सुरू होताच अनेकांनी स्वत:हून कर भरण्यास सुरुवात केली. दोनच दिवसात १ लाख ६६ हजार ४५५ रुपयांची करवसुली झाली.
मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीने प्रत्येक प्रभागातील ग्रामस्थांच्या अडचणी सोडवल्या. रस्ते, गटर, पाणी, आरोग्याच्या सुविधा दिल्या. मात्र, काही ग्रामस्थ कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीला हे कडक धोरण अवलंबावे लागले. यापुढे ग्रामस्थांनी वेळत कर भरावा, असे आवाहन सरपंच अमोल पाटील यांनी केले आहे.
फोटो : ०३केआरडी०४
कॅप्शन : मंद्रुळकोळे, ता. पाटण येथे थकीत करापोटी ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली.