शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

रसिकांसमोर तिजोरीने जोडले ‘कर’

By admin | Published: February 13, 2015 12:03 AM

महसुलात घट : करमाफीच्या शासकीय निर्णयामुळे चित्रपगृह चालकांना दिलासा

सातारा : शासन महसूल वाढीसाठी वेगवेगळ्या तजविजा करत असले तरी चित्रपटगृहांना कर माफीचा निर्णय घेतला गेल्याने शासनाला महसूली तोट्याला सामोरे जावे लागत आहे. सातारा जिल्ह्यात हा निर्णय घेण्याआधी जानेवारी २0१४ अखेर ७९ लाख ७३ हजार रुपयांचा महसूल जमा झाला होता. करमाफीच्या निर्णयानंतर जानेवारी २0१५ अखेर अवघा ५६ लाख ५३ हजार इतका करमणूक कर तिजोरीत जमा झाला आहे.शासन विविध घटकांच्या माध्यमातून करमणूक कर वसूल करते. चित्रपटगृहांकडूनही करमणूक कर वसूल केला जात होता. मात्र, गेल्या सप्टेंबरमध्ये शासनाने चित्रपटगृहांना करमणूक करमाफीचा अद्यादेश जाहीर केला. या निर्णयामुळे चित्रपटगृहांचा करमणूक कर माफ झाला आहे. सातारा जिल्ह्यात एकूण १५ चित्रपगृह आहेत. यापैकी सातारा शहरातील ३, कऱ्हाड शहरातील २, फलटण शहरातील १, रहिमतपूर १, कोरेगाव १, वडूज २, उंब्रज १ व मलकापूर १ अशा एकूण १२ चित्रपगृहांनी करमणूक कर माफीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सविस्तर अर्ज केले होते. त्याचा फायदा त्यांना झाला. ही चित्रपगृहे करमणूक करातून वगळण्यात आली आहेत.करमणुकीची साधने वाढली असल्याने चित्रपगृहे ओस पडत असल्याची ओरड केली जात होती. काही दिवसांपूर्वी तशी परिस्थितीही होती. या मंदीच्या कालावधीत शहरातील अनेक चित्रपगृहे बंद पडली. त्यातील काही चित्रपगृह मालकांनी चक्क अपार्टमेंटची बांधकामे करुन जागेचा पैसा केला. त्यातूनही जे काही मोजके व्यावसायिक होते. त्यांनी चित्रपटगृहांच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले. यातून डबल स्क्रिन करुन दोन-दोन चित्रपट दाखविण्यात यश आले.जिल्हा प्रशासनाला एप्रिल २0१३ ते मार्च २0१४ या कालावधीत ८९ लाख ३३ हजार ८६२ रुपयांचा महसूल मिळाला होता. करमाफीच्या निर्णयामुळे या महसुलात घट झाली आहे. मार्चअखेर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. (प्रतिनिधी)या चित्रपगृहांना फायदाराधिका, राजलक्ष्मी, समर्थ (सातारा), प्रभात स्क्रिन १, स्क्रिन २ (कऱ्हाड), नामवैभव (फलटण), दिग्विजय (रहिमतपूर), दौलत (कोरेगाव), अलंकार, मनिष (वडूज), शुभम (उंब्रज), नटराज (मलकापूर) या चित्रपगृहांना करमणूक कर माफीचा फायदा झाला आहे.