शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

शिक्षक बँकेत सत्तांतर !

By admin | Published: June 23, 2015 12:27 AM

समिती-दोंदे गटाला चार जागा : १७ जागा जिंकून शिवाजीराव पाटील, संभाजीराव थोरात, परिवर्तन पॅनेलची सरशी

सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत एकत्रित आलेल्या शिक्षक संघाचे शिवाजीराव पाटील, संभाजीराव थोरात व सिद्धेश्वर पुस्तके यांच्या परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी शिक्षक समितीचे विठ्ठल माने यांच्या सत्ताधारी प्रगती पॅनेलचा १७-४ असा धुव्वा उडविला. संघाच्या एकत्रित ताकदीमुळे बँकेत सत्तांतर झाले. या निवडणुकीसाठी आठ हजार ८८० मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. सर्वसाधारण गटातील कऱ्हाड, वाई, कोरेगाव, मायणी हे मतदारसंघ समितीच्या ताब्यात राहिले, तर नागठाणे, आरळे, परळी, जावळी, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण, तरडगाव, रहिमतपूर, खटाव, दहिवडी, म्हसवड या मतदारसंघांमध्ये संघाने झेंडा फडकाविला. राखीव मतदारसंघातील पाचही जागा संघाने ताब्यात घेतल्या. मतदारसंघनिहाय उमेदवारांची मते अशी, नागठाणे : राजेंद्र घोरपडे (शिक्षक संघ २७६ मते विजयी), विशाल कणसे (शिक्षक समिती १८७), बाळकृष्ण कणसे (१५७), आरळे : दत्तात्रय कोरडे (संघ ३४३ विजयी), रजनी चव्हाण (समिती १९६), परळी : राजकुमार जाधव (संघ १८८ विजयी), अनिल चव्हाण (समिती १६९), जोतिराम जाधव (५२), महेश वंजारी (१), जावळी : शंकर जांभळे (संघ ३०१ विजयी), संपत शेलार (समिती २९१), कृष्णा पाटील (३), महाबळेश्वर : चंद्रकांत आखाडे (संघ १८७ विजयी), भाऊसाहेब दानवले (समिती १०१), खंडाळा : भगवान धायगुडे (शिक्षक संघ २७४ विजयी), नानासाहेब शेडगे (शिक्षक संघ बंडखोर १८१), विजय नेवसे (समिती ४८), मच्छिंद्र ढमाळ (१), फलटण : अनिल शिंदे ( संघ ४२८), रामचंद्र बागल ( समिती १९७), नितीन बनसोडे (३८), मारुती कर्णे (१), तरडगाव : तुकाराम कदम (संघ ३३४ विजयी), संजय बोबडे (समिती २६३), विजय भोसले (३५), संतोष निंबाळकर (०), रहिमतपूर : मोहन निकम (शिक्षक संघ २६३ विजयी), खटाव : बंडोबा शिंदे (शिक्षक संघ २७७ विजयी), दीपक घनवट (समिती २३४), दहिवडी : महेंद्र अवघडे (शिक्षक संघ २१४ विजयी), म्हसवड : राजाराम खाडे (शिक्षक संघ २३२ विजयी), सतीश कुंभार (समिती २०६), मायणी : चंद्रकांत मोरे ( समिती ३१६ विजयी), नवनाथ खरमाटे (शिक्षक संघ २६९), कोरेगाव : किरण यादव (समिती ३३४ विजयी), प्रमोद देशमुख ( संघ २६५), कऱ्हाड-पाटण : सुभाष शेवाळे ( समिती ३९९ विजयी), प्रदीप घाडगे (संघ २९२), वाई : विठ्ठल शिंदे ( समिती ४०५ विजयी), सहदेव फणसे (संघ ३७६). अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघ : ज्ञानेश्वर कांबळे (४८२१ शिक्षक संघ विजयी), विजयकुमार अडसूळ (३७५९ समिती), विजय भोसले, २८६), संपतराव निकाळजे (४१), विमुक्त जाती व भटक्या जमाती : बलवंत पाटील (संघ ४९४९ विजयी), अरुणकुमार खाडे (समिती ३७७७), विजय थोरात (७७), इतर मागास प्रवर्ग : गणेश तोडकर (संघ ४९२६ विजयी), दीपक भुजबळ (३८२१ समिती), सचिन गाढवे (३५), प्रदीप नीळकंठ (१७), महिला राखीव : वैशाली जगताप (४६२६), निर्मला बसागरे (४०९६ संघ दोघीही विजयी), पवित्रा फरांदे (समिती ३३८७), राजश्री बोबडे (४६), बाळूताई गरुड (३०). निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांच्या नेतृत्वाखाली शांततेत भूविकास बँकेच्या केंद्रात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दरम्यान, विजयानंतर शिवाजीराव पाटील, संभाजीराव थोरात व सिद्धेश्वर पुस्तकेप्रणीत परिवर्तन पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. गुरुजींच्या बँकेतही अवैध मतांचा पाऊसप्राथमिक शिक्षक बँकेसाठी समाजातला तज्ज्ञ समजला जाणारा गुरुजन वर्ग मतदान करीत असतो. अशावेळी अवैध मते कमी आढळतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र, गुरुजींची ५२ मते अवैध ठरल्याने हा अंदाज फोल ठरला.