शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

शिक्षक गोव्याला; पालकांत नाराजी -अधिवेशनासाठी रजेवर :अनेक शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 11:43 PM

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अधिवेशन पणजी (गोवा) येथे होत असून, या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक गेले आहेत. सोमवारपासूनच काही शिक्षक शाळेतून गायब झाले असून,

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान काही ठिकाणी स्वयंसेवकांकडून ज्ञानदानचार शिक्षकांवर पंधरा शाळांचा भार

कºहाड : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अधिवेशन पणजी (गोवा) येथे होत असून, या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक गेले आहेत. सोमवारपासूनच काही शिक्षक शाळेतून गायब झाले असून, शिक्षकांअभावी शाळांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. काही शाळांमध्ये स्वयंसेवक नेमले असले तरी त्यांच्यामार्फत किती ज्ञानदान होणार, हा संशोधनाचा विषय आहे.गोवा येथे होणाऱ्या शिक्षक अधिवेशनासाठी तालुक्यातील शेकडो शिक्षक गेले आहेत. काही शिक्षकांनी त्यांच्या रजेचे अर्ज शिक्षण विभागाकडे दिले आहेत. शिक्षक रजेवर गेल्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच कोलमडल्यासारखी परिस्थिती निर्माण झालीे सांगितले.चार शिक्षकांवर पंधरा शाळांचा भारमलकापूर : शिक्षक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर केंद्र्रातील पंधरा शाळांमधील ५५ शिक्षकांपैकी तब्बल ४८ शिक्षकांनी रजेचे अर्ज दिले आहेत. तर तीन शिक्षक दीर्घ रजेवर आहेत. रजा घेतलेल्या ४८ पैकी २० शिक्षकांनी मंगळवारी प्रत्यक्ष कामावर हजर राहून शाळा सुरू ठेवल्या असल्याची माहिती केंद्रप्रमुखांनी दिली. मात्र अधावेशन काळात ४८ जण रजेवर गेल्यास केवळ चार शिक्षकांवर पंधरा शाळांची जबाबदारी असणार आहे.मलकापूर केंद्र्रांतर्गत एकूण १५ शाळा कार्यरत आहेत. त्यामध्ये दोन शिक्षकी ७, तीन शिक्षकी १, चार शिक्षकी ३, तर बहुशिक्षकी ४ प्राथमिक शाळा आहेत. या पंधरा शाळांमध्ये ५५ शिक्षक १ हजार २०४ विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत आहेत. गोव्यातील शिक्षक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर केंद्र्रांतर्गत ५५ शिक्षकांपैकी ४८ शिक्षकांनी रजेचे अर्ज दिले आहेत. तर तीन शिक्षक दीर्घ रजेवर आहेत. अर्ज न दिलेले केवळ चारच शिक्षक उरले आहेत. मात्र रजेचे अर्ज दिलेल्या ४८ पैकी २८ जण सोमवारपासूनच गायब आहेत.गैरहजर शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाईपाटण : गोवा येथे दि. ८ व ९ फेब्रुवारी रोजी होणाºया राष्ट्रीय शिक्षण परिषद आणि महाअधिवेशनासाठी पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून अनेक शिक्षक शाळा बंद ठेवून आणि शिक्षण विभागाची परवानगी न घेताच गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, शिक्षकांच्या रजेसंदर्भात प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारचे अधिकृत पत्र नसल्यामुळे गैरहजर शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचे लेखी पत्र शिक्षणाधिकाºयांनी काढले आहे. त्यामुळे दहा दिवस रजेवर गेलेल्या प्राथमिक शिक्षकांना हे अधिवेशन रजा भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अखिल भारतीय प्राथामिक शिक्षक महासंघाची राष्ट्रीय शिक्षण परिषद व महाअधिवेशन पणजी (गोवा) कला अकादमी या याठिकाणी आयोजित केले आहे. यासाठी प्राथमिक शिक्षकांना अधिवेशन कालावधीत ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसांची विशेष त्रिमासिक रजा मंजूर केल्याची माहिती अखिल भारतीय शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आली असल्याने तालुक्यासह राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांनी दहा दिवसाची अधिवेशन रजा काढून या महाअधिवेशनाला मार्गस्थ झाले आहेत. त्यामुळे विनापरवानगी गैरहजर राहणाºया शिक्षकांना हे प्रकरण भोगणार आहे.शाळांवर स्वयंसेवक नेमण्याचा आदेशमुलांचे नुकसान होऊ नये म्हणून सर्व शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनेक शाळेत हौशी स्वयंसेवक शिक्षकांची नेमणूक करूनच शिक्षकांना अधिवेशनात सहभागी व्हावे. कोणतीही शाळा बंद ठेवणार नाहीत, अशी तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे अधिकृत सूत्रांकडून समजले आहे.मलकापूर केंद्रात ५५ शिक्षकांपैकी ४८ जणांनी रजेचे अर्ज दिले आहेत तर ३ दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. अधिवेशनात सहभागी होण्यासाठी शाळा बंद ठेवणार नाही. पंधरा शाळांमध्ये मंगळवारी २४ शिक्षक कामावर होते. अधिवेशन काळातही वरिष्ठांच्या सूचनेनुसार सर्व शाळा सुरू ठेवण्याची पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे.- शारदा भुसारी,मलकापूर केंद्रप्रमुख

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTeacherशिक्षक