शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

सांगा..‘कृष्णे’तील ६५ कोटींचे कर्ज कुणाचे?

By admin | Published: December 03, 2015 12:37 AM

७८४ वाहनधारकांना नोटिसा : जुन्या संचालक मंडळाने कशाच्या आधारावर कर्ज उचलले?

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१४-१५ च्या ऊस गळित हंगामासाठी ऊसवाहतूक करणाऱ्या ७८४ वाहनधारकांना न घेतलेल्या कर्जापोटी प्रत्येकी ७ लाख रुपये अशा एकूण ६५ कोटी २ लाखांच्या परतफेड करण्याच्या बोगस नोटिसा बँक आॅफ इंडियाच्या कऱ्हाड शाखेतून बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांमुळे सर्व वाहनधारक हवालदिल झाले असून, याबाबत चौकशी करण्यात यावी, असे निवेदन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे. निवेदनातील माहिती अशी, सन २०१४-१५ च्या गळित हंगामासाठी ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ७८४ वाहनधारकांच्या मालकांनी कोणत्याही प्रकारचे कर्ज बँक आॅफ इंडियाकडून घेतले नाही. तसेच बहुतांश वाहनमालकांनी कोणत्याही प्रकारचा करार या कारखान्याशी केलेला नाही. असे असतानाही एकूण ७८४ वाहनमालकांना प्रत्येकी ७ लाख रुपये असे एकूण ६५ कोटी २ लाखांची परतफेड करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कर्ज नसतानाही नोटिसा आल्यामुळे सर्व वाहनमालक हवालदिल झाले आहेत. नोटिसा आल्यामुळेच आम्हाला कर्जाबाबत माहिती मिळाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. कर्ज असताना गेल्या वर्षभरात बँकेने कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार न करता अचानक नोटीस कशी बजावली? असा प्रश्न वाहनमालक उपस्थित करत आहेत. तसेच बँकेकडून सन २०१४-१५ सालात कर्ज प्रकरणासाठी फसवून सह्या घेण्यात आल्या असल्याचे वाहनमालकांचे म्हणणे आहे. तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते व त्यांच्या संचालक मंडळाने कशाच्या आधाराने कोट्यवधींचे कर्ज उचलले, मिळालेली रक्कम अध्यक्ष अविनाश मोहिते व संचालक मंडळाने नेमकी कोठे खर्ची घातली, की या कोट्यवधींच्या रकमेचा अपहार अथवा गैरमार्गासाठी अवलंब झाला आहे, या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. कारखान्याच्या माहितीनुसार ७८५ ठेकेदारांच्या नावे ८३१ करारप्रकरणे झाली आहे. या प्रकरणांपैकी २७८ प्रकरणे अशी आहेत की, ज्यामध्ये संबंधित वाहनमालकांनी व बैलगाडीधारकांनी कारखान्यांशी कोणताही करार केलेला नाही. तसेच कारखान्याकडून किंवा बँकेकडून कोणतीही अ‍ॅडव्हान्स रक्कम उचललेली नाही. तरीही तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते व संचालक मंडळाने २७८ लोकांच्या नावे १९ कोटी ४६ लाखांची कर्जे घेतली आहेत. वाहनमालकांची कोणतीही परवानगी नसताना, तसेच कारखान्याशी कोणताही संबंध नसताना कोट्यवधी रुपये उचलून बोगस कर्ज प्रकरणे करून आमची फसवणूक केली आहे. आमच्या नावे कर्ज उचलण्याचा मोहिते यांचा प्रकार म्हणजे आमच्याबरोबर बँकेचीही शुद्ध फसवणूक आहे. कारखान्याकडून ८३१ करारांपैकी ५५३ करारधारकांना प्रत्येक वाहनामागे कमीत कमी ५० हजारांपासून जास्तीत जास्त ५ लाखांपर्यंत रक्कम करारापोटी अ‍ॅडव्हान्स म्हणून देण्यात आली. ही रक्कम संबंधित वाहनधारकांकडून परतफेड करण्यात आली असतानाही, प्रत्येकाला बँकेकडून प्रत्येकी ७ लाखांची परतफेडीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळाच्या या बेजबाबदार कारभाराची सखोल चौकशी करावी, तसेच करार नसतानाही कर्ज प्रकरणे कशी केली, तो पैसा कोठे वापरला, याची सखोल चौकशी करून वाहनमालकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) बँकेकडून अनाधिकाराने नोटिसा : अविनाश मोहिते - डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या संचालक मंडळाच्या काळातील कर्जाची जबाबदारी आमच्या संचालक मंडळाने घेतली. मात्र आमच्या संचालक मंडळाने काढलेल्या कर्जाची जबाबदारी न घेता आणि कारखान्याची जाबाबदारी असताना शेतकऱ्यांना नोटीसा पाठविण्यात येत आहेत. बँकेने कारखान्याला कर्ज दिले आणि कारखान्याने तोडणी वाहतूकदारांना उचल दिली असताना बँकेने अनाधिकाराने नोटीसा पाठविल्या आहेत,’ असा आरोप कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी एका पत्रकान्वये केला आहे. - आपल्या पत्रकात मोहिते पुढे म्हणाले की, सहा वर्षांपूर्वी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या काळात आयडीबीआय बँकेचे बेसल डोससाठी शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलण्यात आले होते. ते कर्ज थकित झाल्यानंतर आम्ही कोणत्याही शेतकऱ्यांना नोटिसा जाणार नाहीत, याची काळजी घेतली होती. आता बँक आॅफ इंडियाचे तोडणी वाहतुकीचे कर्ज थकित आहे. ते भरण्यास विद्यमान संचालक मंडळाने नकार दिला आहे. तसेच त्या कर्जाचे पुनर्गठणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे बँकेने तोडणी वाहतूकदार व शेतकरी सभासदांना त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या आधारे नोटिसा पाठविलेल्या आहेत.’ - ‘हा संपूर्ण विषय क्लिष्ट आणि कायदेशीर स्वरूपाचा आहे. आम्हा संचालकांना व संस्थापक पॅनेलला बदनाम करण्यासाठी व अपुऱ्या माहितीच्या आधाराने बदनामीकारक माहिती माध्यमांकडे पाठविले जात आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत,’ असेही माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पत्रकात म्हटले आहे.