महाबळेश्वर : थंड हवेमुळे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये शनिवार, रविवारच्या सुट्यांमुळे पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. महाबळेश्वरची संध्याकाळची गुलाबी थंडी, हिरवागार निसर्ग अशा वातावरणात महाबळेश्वर पर्यटनस्थळी गर्दी वाढत आहे. मात्र, दुपारच्या वेळी सूर्यनारायण चांगलचे तळपू लागले आहेत. पारा सरासरी ३२ अंशांवर पोहोचला आहे. अंगातून घामाच्या धारा लागत आहे. उकाडा कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत भलामोठा मांडव घातला आहे.एप्रिल-मे महिन्यामध्ये महाबळेश्वरला लाखो पर्यटक भेट देतात. येथील हिरवागार निसर्ग, थंडगार हवेचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातून तसेच महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यातून लाखो पर्यटक महाबळेश्वर फिरण्यास येतात. येथील ॲार्थर सिट, केट्स पॉईंट, क्षेत्र महाबळेश्वर, किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉइंट ही पर्यटनस्थळे गर्दीने गजबजली आहेत. वेण्णालेकला सायंकाळी चौपाटीचे स्वरूप येत आहे.यंदा मात्र महाबळेश्वरच्या तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. सकाळी साडेअकरा ते चार वाजेपर्यंत ३२ अंश तर सध्याकाळी पाचनंतर सायकाळी १८ अंशपर्यंत तापमान जात आहे. स्थानिक नागरिकांची घरे, दुकानामध्ये पंख्याची आवश्यकता भासू लागली आहे. काही नागरिकांना तर रात्री पंख्याच्या हवेची गरज भासू लागत असल्याचे मत व्यक्त केले.
Satara: थंड हवेच्या महाबळेश्वरात सूर्यनारायण लागले तळपू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 12:28 PM