सातारा : सातारा जिल्ह्यात दि. १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने सातारा शहर श्री छत्रपती शाहू क्रीडासंकुल परिसरातील वाहनधारकांच्या व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या नियमनाकरिता श्री छत्रपती शाहू क्रीडासंकुल परिसरातील वाहतूक मार्गात बदल तसेच पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी दिले आहेत.
वाहतूक मार्गातील ताप्तुरते बदल- सातारा श्री छत्रपती शाहू क्रीडासंकुलकडे जाणारा मार्ग हा सुभाषचंद्र बोस चौक, एस.टी. स्टॅण्ड इनगेट येथून मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांकरिता वाहतुकीसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग - मेढा, महाबळेश्वर, जुना हायवेमार्गे येणाऱ्या सर्व एस.टी. बसेस तसेच सर्व वाहने एस.टी.स्टॅण्ड येथे जाण्याकरिता भूविकास बँक, जुना आर.टी.ओ. चौकमार्गे येजा करतील. वाढेफाटामार्गे येणारी सर्व वाहने एस.टी.स्टॅण्ड येथे जाण्याकरिता जुना आर.टी.ओ. चौक येथून पारंगे चौकमार्गे येजा करतील. एस.टी. बसेस पारंगे चौक येथे एस.टी. स्टॅण्ड इनगेटमार्गे येजा करतील. इतर सर्व वाहने पारंगे चौक येथून पोवईनाका तहसीलदार ऑफिसमार्गे एस.टी.स्टॅण्ड येथे येजा करतील.
बॉम्बे रेस्टॉरंट, शिवराजफाटा येथून मोळाचा ओढाकडे जाणारे सर्व वाहनांनी राधिका रोडमार्गाचा वापर करावा. वाहनांचे पार्किंग शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे दुचाकी, चारचाकीकरिता एस.टी. स्टॅण्डसमोर असणारे महसूल विभागाचे पार्किंग जागेत व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालाकरिता आलेल्या नागरिकांचे सर्व प्रकारच्या वाहनांंकरिता पूर्वीचे भूविकास बँकेच्या मोकळ्या मैदानावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.