शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

हंगामी शिक्षकांना धास्ती..!

By admin | Published: March 27, 2015 10:47 PM

सातारा पालिका : गेल्या वर्षाचा पगार नाही; यंदा तरी मिळणार का?, शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था

सातारा : नगर पालिकेच्या शाळेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी नगर पालिकेने नव्याने सुरू केलेल्या सेमी इंग्रजी व प्ले गु्रप संकल्पनेला पालकांकडून प्रतिसाद मिळाला असला तरी या शिक्षण प्रणालीसाठी नव्याने घेतलेल्या हंगामी शिक्षकांचे आजअखेर गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याचा पगार मिळाला नाही. त्यामुळे चालू वर्षाच्या एप्रिल महिन्याचे काम करायचे की नाही, या संभ्रमावस्थेत शिक्षक आहेत.स्पर्धात्मक युगात पालिका व जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या खालावली जात आहे. यासाठी शाळेची गुणवत्ता वाढविण्याच्या हेतूने गेल्या वर्षापासून सातारा पालिकेने ‘प्ले गु्रप’ व ‘सेमी इंग्रजी’ सुरू केली आहे. त्यानुसार पालिकेच्या पाच शाळांमध्ये ‘प्ले गु्रप’ व पाच शाळांमध्ये ‘सेमी इंग्रजी’ सुरू करण्यात आले आहे. यासाठी ‘प्ले गु्रप’मध्ये पाच शिक्षिका व पाच सेविका तर सेमी इंग्रजीसाठी स्वतंत्र हंगामी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी यातील काही हंगामी शिक्षकांनी एप्रिल महिन्यातही शाळेचे कामकाज केले. तरीदेखील एप्रिल महिन्यात केलेल्या कामाचा मोबदला आजअखेर त्या शिक्षकांना मिळालाच नाही. याबाबत काही शिक्षकांनी पालिकेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता मार्च अखेरच तुमचे टेंडर असल्याचे सांगण्यात आले. तर काहीजण पगार मिळण्याची शिक्षकांना हमी देत आहेत. यंदा चालू वर्षाचा जूनपासूनचा पगार मिळाला असला तरी गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याचा पगार अद्याप मिळाला नसल्याने पुढील महिन्यात काम करायचे की नाही, असा प्रश्न या हंगामी शिक्षकांना पडला आहे.याबाबत पालिकेने मात्र आळीमिळी गुपचिळीची भूमिका घेतली आहे. याविषयी आपली भूमिका नगरपालिका स्पष्ट करत नसल्याने एप्रिल महिन्याची जबाबदारी कोण घेणार, असाही यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे टेंडर असेल तरच हंगामी शिक्षक काम करण्यास इच्छुक असून, गेल्या वर्षीचा एप्रिल महिन्याचा पगार मिळाला तरच पुढील महिन्यात काम करण्याचा निर्णय त्या शिक्षकांनी घेतला आहे.पालिकेने हंगामी शिक्षकांचा पगार देऊन मुलांचे होणारे नुकसान टाळावे, अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)संबंधित शिक्षकांनी थेट माझ्याकडे येऊन आपले म्हणणे मांडावे. गेल्या वर्षीचा एप्रिल महिन्याचा पगार नेमका कोणत्या कारणामुळे रखडला आहे, हे पाहून पुढील कारवाई करू .- आशिष लोकरे, अतिरिक्त मुख्याधिकारी, सातारा पालिका