आदर्की : फलटण तालुक्यातील सासवड (झणझणे) येथे कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने ती संसर्ग रोखण्यासाठी गावातील मेडिकल, दवाखाना, भाजीपाला, दूध वगळता सर्व दैनंदिन व्यवहार दहा दिवस बंद ठेवून जनता कर्फ्यू घोषित करून ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
सासवड (झणझणे) (ता. फलटण) येथे गत महिन्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. सासवड अंर्तगत आठ ते दहा वाड्या आहेत. गावात असणारा कोरोना संसर्ग वाडी-वस्तीवर होऊ लागल्याने गावठाण, चिमणराव कदम पतसंस्था परिसर, बाजारपेठ, अनपट आळी, जाधव वस्ती, बांदल वस्ती, वडाचा मळा, सुतार वस्ती, धनगर आळी, झणझणे आळी, हिंगणगाव रोड, कुंभार वस्ती, नलवडे बेंद, आदी विभाग कंटेन्मेंट व सासवड गाव
बफर झोन प्रातांधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
गावातील सर्व किराणा, प्रोव्हिजन, आदी आस्थापना बंद राहणार आहेत, तर दूध, भाजीपाला सकाळी सहा ते नऊ या वेळेत सुरू राहणार आहे.