शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जिल्ह्यात दहाजण तडिपार

By admin | Published: September 25, 2015 11:56 PM

गणेशोत्सव पार्श्वभूमी : चार मटका बहाद्दरांचाही समावेश

सातारा/वाई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने ‘हिटलिस्ट’वर असणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली असून, साताऱ्यामध्ये चार मटका बहाद्दर तर वाई आणि खंडाळा तालुक्यातील सहाजणांना तडिपार करण्यात आले आहे. आणखी २८ जण हिटलिस्टवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.समीर सलीम कच्छी (वय ३५ रा, सैदापूर) (टोळी प्रमुख), पोपट आनंदा माने (५८, रा. कोडोली, सातारा, मुळ रा. आरफळ ता. सातारा), यासीन इक्बाल शेख (३३, रा. शनिवार पेठ, सातारा), सचिन सुरेश मोरे (३२, रा. शनिवार पेठ, सातारा) या दोन्ही सातारा शहर व शाहूपुरी, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याचे जाळे निर्माण करत होत्या. त्यामुळे या चौघांना सातारा तालुका हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडिपार करण्यात आले आहे. या चौघांवर वारंवार कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला.वाई येथील कारवाईची माहिती देताना प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर म्हणाले, ‘४२ जणांचा हद्दपारीचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्यापैकी अमीर अकबर खान (रा. वाई) याची चार जिल्ह्यातून, संजय धायगुडे (रा. अहिरे, ता. खंडाळा) याची चार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी, दादासाहेब वाखंडे व अमर वाखंडे (रा. वाकणवाडी, ता. वाई) यांची एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून, बंट्या उर्फ अनिकेत नारायण जाधव आणि वरुण समर जाधव (दोघेही रा. भुर्इंज) यांना तीन दिवसांसाठी सातारा, सांगली जिल्ह्यांतून तडिपार करण्यात आले आहे. या सर्वांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार तडिपार करण्यात आले आहे. हे सर्वजण ज्या जिल्ह्यात जातील तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात दर सोमवारी हजेरी लावणे त्यांना बंधनकारक असून आणखी काहीजणांना तडिपार केले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)