शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

दहावीची परीक्षा.. टेन्शन काय को !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:26 AM

सातारा : शालेय जीवनातून महाविद्यालयीन आयुष्यात जाण्याची मोठी पायरी म्हणजे दहावीची परीक्षा. या परीक्षेचा अनेक घरांमध्ये इतका बाऊ होतो ...

सातारा : शालेय जीवनातून महाविद्यालयीन आयुष्यात जाण्याची मोठी पायरी म्हणजे दहावीची परीक्षा. या परीक्षेचा अनेक घरांमध्ये इतका बाऊ होतो की, पालकांच्या चेहऱ्यावरील ताण पाहून बिच्चारे विद्यार्थीच गांगरून जातात. त्यामुळे बोर्डाची परीक्षा म्हणून सामाजिक दबावाने भेदरलेला विद्यार्थी पुरता गोंधळून जातो. दहावी बोर्ड टेन्शन काय को लेने का? अशी मानसिकता पालकांची झाली तरच विद्यार्थी या परीक्षा तणावरहित वातावरणात देऊ शकतील.महाविद्यालय प्रवेशाची पायरी म्हणून दहावीच्या परीक्षांकडे पाहिले जाते. त्यामुळे येथे काही कमी अधिक झाले तर महाविद्यालयीन एन्ट्री लांबली, ही मानसिकता दहावीत प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यात वर्षभर विविध कारणांनी येणाºया पै-पाहुण्यांचे लेक्चर आणि शेजाºयांच्या खत पाण्यामुळे तर विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढत जातो. सामान्य परीक्षांसारखी ही परीक्षा आहे, त्यासाठी आवश्यक अभ्यास करा इतकंच विद्यार्थ्यांना सांगितले तरी पुरेसे ठरते.आपली शाळा सोडून अन्य शाळांमध्ये परीक्षेची व्यवस्था असल्याने काहीदा विद्यार्थ्यांवर त्याचाही ताण राहतो.विद्यार्थ्यांच्या या ताणाचा कुठेच विचार होत नाही. याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं बनत आहे.परीक्षेवेळी मुलांनी घ्यावयाची खबरदारीपरीक्षेच्या अगोदरच्या दिवशी पूर्ण प्रकरण न वाचता नोट्सची उजळणी करा.नवीन काही वाचू नका. संकेत शब्द, सूक्ष्म टिपणे, आकृत्या, नकाशे, तक्ते यांचे धावते निरीक्षण करा.झोप पूर्ण व सलग घ्या. जागरण टाळा. पहाटेपासूनच शांत व उत्साही वातावरणात अभ्यासाला सुरुवात करा.परीक्षेला लागणाºया आवश्यक साहित्याची जमवाजमव करा. सर्व साहित्य एकाच ठिकाणी ठेवा. कपड्यांना इस्त्री व बुटाला पॉलीस करून ठेवा.परीक्षा देताना खूप सोपे प्रश्न असतील तर खूप घाई करू नका.अवघड प्रश्न असेल तरी घाबरू नका. त्याला सामोरे जा. तुम्हाला ते अवघड वाटत असतील तर ते इतरांनाही अवघड असतात. त्यातल्या त्यात जो धीराने त्या प्रश्नाला सामोरे जातो, उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो, तो अधिकगुण मिळवतो. जो त्याचा ताण घेतो, तो अधिक चुका करतो.कसाही प्रश्न असेल तरी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीन. शेवटच्या आत्मविश्वासाने मी पेपर लिहीन, असा निर्धार सातत्याने करा.चुकूनही कॉपी करू नका, कोणी आग्रह करत असेल तरीही करू नका. इतर विद्यार्थी कॉपी करतात, तेव्हा आपल्याला वाटते की, ते आपल्या पुढे जातील; पण अशा मुलांचा पाया कच्चा असल्याने ते भविष्यात मागे पडतात. त्यामुळे तुम्ही प्रामाणिक प्रयत्नांनी पुढे जा.उत्तरपत्रिका सोडविताना सुवाच्च अक्षरात आपला परीक्षा क्रमांक, दिनांक, केंद्र अशी सर्व माहिती अचूक भरा.बारकोड चिटकवण्यापूर्वी आपलाच असल्याची खात्री करा.उत्तरपत्रिकेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा.निळ्या किंवा काळ्या शाईच्याच पेनचा करा.सोपे प्रश्न लक्षात घ्या. प्रश्नांची निवड महत्त्वाची असते.विचारले तेच व तेवढेच लिहा. पेपर दिलेल्या वेळेत पूर्ण होतो.प्रश्नांचा क्रमांक अथवा उपप्रश्न क्रमांक ठळक अक्षरात ठेवा.उत्तराचा आराखडा मनात तयार करा.उत्तरप्रत्रिकेवर कोठेही डाग पाडू नका. परीक्षकांसाठी सूचना लिहू नका.परीक्षेला निघतानापरीक्षेला निघताना आवश्यक सर्व साहित्य सोबत घ्या. ओळखपत्र, हॉल तिकीट, पेन (किमान तीन), पेन्सिल ,शार्पनर, स्केल, लाँगरिथम, कंपासबॉक्स, खोडरबर, पँड, पाण्याची बाटली, रुमाल, घड्याळ, गरजेनुसार पैसे सोबत ठेवावेत.हलका आहार घ्यावा. (साधी पोळी, भाजी, वरणभात). पोटभर न खाता थोडी भूक शिल्लक ठेवा.रस्त्यातील वाहतूक, ट्रॅफिक जॅमचा विचार करून योग्य वेळेत निघा.सायकलने प्रवास करत असाल तर रुमाल/टोपी वापरा. मोटारसायकलने जात असाल तर हेल्मेट अवश्य घाला.परीक्षेच्या अर्धा तास आधी सेंटरवर पोहोचा.परीक्षा हॉलमध्येपरीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका हातात पडेपर्यंतचा संपूर्ण काळ मानसिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो, हे लक्षात ठेवा. यासाठी मन स्थिर ठेवा. जो अभ्यास आपण केलेला आहे, तेवढे आपण निश्चितपणे लिहू शकतो, यावर विश्वास ठेवा.मागे काय झाले, पुढे काय होईल, याची चिंता न करता शांत बसा. कोणतीच प्रश्नोत्तरे आठवण्याचा प्रयत्न करू नका.परीक्षा झाल्यावरपेपरनंतर उतरांबाबत मित्रांसोबत चर्चा टाळा.किती गुण मिळतील, यांची बेरीज करीत बसू नका.काही उत्तरे चुकली असल्यास त्यांचा विचार न करता जे बरोबर लिहिले आहे, त्यावर समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा.झालेल्या पेपरची चिंता न करता पुढच्या पेपरची तयारी सुरू करा.