शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

सातारा जिल्ह्यात जोर'धार'; कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून, किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली

By दीपक शिंदे | Published: July 24, 2024 12:30 PM

पाटण तालुक्यात रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम; प्रशासन सतर्क

सातारा : सातारा शहरात पावसाची संततधार असून किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली आहे. तर कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने कऱ्हाड तालुक्यात एका बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यामुळे काही भाग वाहून गेला आहे. त्याचबरोबर पाटण तालुक्यात रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे सतत घटना घडत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.सातारा शहरात बुधवारी पहाटेपासून पावसाची संततधार आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. शहराला लागूनच अजिंक्यतारा किल्ला आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच सकाळच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे मार्गावर दगड पडले आहेत. नगरपालिकेने दरड हटविण्यासाठी जेसीबी पाठविला आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दरम्यान, भुयाचीवाडी, ता. कऱ्हाड येथे कृष्णा नदीवरील बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला. याबाबत जलसंपदा विभागाने तत्काळ आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. तर प्रशासनाने परिसरातील नागरिकांना खबरदारीची सूचना केली आहे. धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आलेले आहे. कामरगाव, ता. पाटण येथील पाबळ नाल्याजवळ कोयना-नवजा रस्ता खचला आहे. यामुळे पाटण तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन उपाययोजना करण्याबाबत सूचना केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडRainपाऊसriverनदी