सातारा : तुमच्या क्रेनचा चालक कुठे आहे असे विचारणा केल्यानंतर काय झाले म्हटल्याने १० ते १५ जणांनी दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना सातारा शहराजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दुखापतीचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी यश प्रमोद चतूर (रा. जरंडेश्वर नाका, खेड सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार अनोळखी १५ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास सातारा शहराजवळ कोल्हापूर-ते पुणे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला हा प्रकार घडला. अनोळखी १५ जणांनी तुमच्या क्रेनचा चालक कोठे आहे अशी विचारणा केली. यावरुन तक्रारदार व त्यांच्याबरोबरच्या एकाने दोन-तीनवेळा काय झाले आहे असे म्हटले. यावरुन चिडून तक्रारदार आणि बरोबर असणाऱ्या एकाला पाय, हातावर मारहाण करत दुखापत केली. तसेच शिवीगाळ आणि दमदाटीही करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक गवळी हे तपास करीत आहेत.
क्रेनचा चालक कुठाय म्हणत दोघांना बेदम मारहाण, साताऱ्यातील प्रकार; १५ जणांवर गुन्हा नोंद
By नितीन काळेल | Published: November 10, 2023 4:33 PM