शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
5
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
6
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
7
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
8
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
9
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
10
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
11
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
12
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
13
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
14
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
15
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
16
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
17
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
18
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
19
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
20
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

Satara: राष्ट्रवादी दादा गटाचे तालुका कारभारी ठरले!, नवे तालुकाध्यक्ष जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: January 16, 2024 12:22 IST

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तालुकाध्यक्ष निवडी होत असून आणखी काही जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यामध्ये ...

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाकडून तालुकाध्यक्ष निवडी होत असून आणखी काही जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यामध्ये कोरेगाव, वाई, खंडाळा, खटाव, महाबळेश्वर, कऱ्हाड, फलटण आणि पाटण तालुकाध्यक्षांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत.याबाबत माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाची बैठक जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष अमित कदम, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्या हस्ते नवनियुक्त तालुकाध्यक्षांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवाजीराव महाडिक (कोरेगाव), प्रमोद शिंदे (वाई), दत्तानाना ढमाळ (खंडाळा), नंदकुमार मोरे (खटाव), बाबुराव सपकाळ (महाबळेश्वर), जितेंद्र डुबल (कऱ्हाड), जयकुमार इंगळे (फलटण), सागर पाटील (पाटण) यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.जिल्हाध्यक्ष संजीवराजे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, आमदार मकरंद पाटील आणि आमदार दीपक चव्हाण यांच्या मान्यतेने जिल्ह्यात पक्ष संघटना बळकटीसाठी तसेच पक्ष विचारधारा तळागाळात रुजवण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत.कार्याध्यक्ष अमित कदम म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष नंबर एकचा करण्यासाठी सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या तालुका कार्यकारणीच्या निवडी लवकरात लवकर करून येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागावे. तसेच पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करावेत. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती संजय देसाई, माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, कांतीलाल पवार, राजेंद्र घाडगे, राजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार