शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

Satara: फलटणमध्ये उमेदवार बाजूलाच, नेत्यांमध्येच खरी लढाई; रामराजे अन् रणजितसिंह निंबाळकर आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:19 PM

महाआघाडी अन् महायुती समोरासमोर ठाकणार

विकास शिंदेफलटण : फलटणविधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. याठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्या उमेदवारापेक्षा नेत्यांमधील लढाईच प्रतिष्ठेची ठरते. रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारांमध्ये होणारी लढत ही चर्चेची असणार आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघावर गेली पस्तीस वर्षे एकहाती रामराजे यांची सत्ता आहे. फलटण नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा या सर्व ठिकाणी रामराजे आणि बंधू संजीवराजे व रघुनाथराजे यांचीच सत्ता पाहायला मिळाली आहे. ज्या ज्या वेळी विरोधक म्हणून नवे नेतृत्व उभे राहिले त्या त्या वेळी रामराजे यांनी त्यांची राजकीय ताकत दाखवली आहे. परंतु लोकसभेसारखी महत्त्वाची निवडणूक जिंकून माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी नवीन सक्षम विरोधक म्हणून राजेगटाला आव्हान दिले.फलटण अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात दीपक चव्हाण तीन वेळा आमदार झाले. यावेळी त्यांचे तिकीट कायम राहिले आणि रामराजे यांनी राखून ठेवलेले डाव बाहेर काढले, तर दीपक चव्हाण चौथ्यांदा आमदार होऊन इतिहास घडवतील.रणजितसिंह यांनी शेतकरी बागायतदार कुटुंबातील सचिन कांबळे पाटील यांची उमेदवारी मोठ्या जल्लोषात जाहीर केली. गेली दोन वर्षे त्यांचे फलटण कोरेगावमध्ये दौरे सुरू आहेत. भाजपचे विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. ते जनतेला किती रुचतात हेही तितकेच महत्त्वाचे.महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?१४ ऑक्टोबरला फलटण येथील भव्य सभेत संजीवराजे व आमदार दीपक चव्हाण कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. परंतु शरद पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी या सभेत जाहीर केली नाही. त्यामुळे दीपक चव्हाण हेच शेवटपर्यंत उमेदवार असणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.२५५ फलटण विधानसभा

  • एकूण मतदार - ३३८४६४
  • पुरुष मतदार - १७२४५९
  • स्त्री मतदार - १६५९९१
  • इतर मतदार - १४ 

२०१९ विधानसभा निकालउमेदवार   - मिळालेली - टक्केवारी

  • दीपक चव्हाण - राष्ट्रवादी ११७६१७ - ५४.५५%
  • दिगंबर आगवणे - भाजप ८६६३६ - ४०.१८%
  • अरविंद आढाव - वंबआ ५४६० - २.५३%
टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणvidhan sabhaविधानसभाRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर