सातारा : जिल्ह्यात पुस्तक, मध आणि नाचणीचं गाव असताना फलटण तालुक्यातील धुमाळवाडीला फळांचं गाव म्हणून घोषीत करण्यात आले आहे. यामुळे धुमाळवाडी महाराष्ट्रातील पहिलंच गाव ठरलं असून यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तर धुमाळवाडीत तब्बल १९ प्रकारची फळे होतात.सातारा जिल्ह्याला एेतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्याचप्रमाणे आता फळांनी समृध्द असणारा जिल्हा म्हणूनही सातारा पुढे आला आहे. कारण, जिल्ह्यात आज विविध ३० प्रकारची फळे शेतकरी घेत आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात अऱ्थाजण होत आहे. तर याच जिल्ह्यात अनेक गावे वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकाचं गाव म्हणून देश पातळीवर नावाजलं आहे. तर याच तालुक्यातील मांघर हे मधाचं गाव आणि जावळी तालुक्यातील कुसुंबी नाचणीचं गाव म्हणून जाहीर झालेले आहे. सातारा शहराजवळील जकातवाडी हे कवितांचं गाव ठरलं आहे. आता याच पंक्तीत फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गाव आलं आहे.सातारा येथील कार्यक्रमात कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी धुमाळवाडीला फळांचं गाव म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे धुमाळवाडी महाराष्ट्रातील फळांचं पहिलं गाव ठरलं आहे. त्याचबरोबर आता गावाची नवीन ओळख निर्माण झालेली आहे. या गावात सध्या विविध १९ प्रकारची फळे घेण्यात येतात. यामध्ये पेरु, सीताफळ, डाळिंब, आवळा, चिंच, अंजिर, केळी, जांभूळ, ड्रॅगनफ्रूट, द्राक्षे, चिकू, लिंबू, संत्री, बोर, नारळ, आंबा, पपई अशी फळे घेतली जातात. तसेच या फळांचा समावेश सलग लागवडीत आहे. तर बांधावरती सफरचंद, स्टार फ्रूट, लिची, काजू, फणस, करवंद, खजूर या फळझाडांचीही लागवड केलेली आहे.या गावाने कृषी विभागाचे विविध मेळावे, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाखाली फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढवलेले आहे. त्याचबरोबर फळबागांमुळे उत्पादन मिळत आहे. तसेच फळप्रक्रिया उद्योग, फळांची निर्यात यामध्ये गावाची झपाट्याने प्रगती होत चालली आहे. यातून शेतकऱ्यांचे अऱ्कारण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्याचबरोबर आता गावातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा लाभ घेऊन नव उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच गावात पर्यटन वाढीस लागणार असल्याने त्यातूनही शेतकऱ्यांना अऱ्थप्राप्ती होणार आहे.गावाची माहितीलागवड योग्य क्षेत्र ३७१ हेक्टरफळबाग लागवड क्षेत्र २५९ हेक्टर
सातारा महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट...वातावरण अनुकूल, जमिनीची सुपिकता वेगळी, दुसरीकडे विभागानुसार ३०० पासून ५ हजार मिलीमीटरपर्यंत पडणारा पाऊस. अशा वैविध्यपूर्ण वातावरणामुळे जिल्ह्यात ७ हजार हेक्टरवर तब्बल ३० प्रकारची फळे घेण्यात येतात. त्यामुळे सातारा जिल्हा महाराष्ट्राचं फ्रूट बास्केट म्हणून पुढे आला आहे.