शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

सातारा: video चांदोबाचा लिंबमध्ये माउलींचे पहिले रिंगण उत्साहात, वरुणराजाचीही हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 18:14 IST

‘माऊली... माऊली....’ असा गगनभेदी घुमणारा आवाज..., लाखो वारकऱ्यांच्या ताणलेल्या नजरा अन् रोखलेला श्वास अशातच वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींच्या व अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत उपस्थित वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

तरडगाव : ‘माऊली... माऊली....’ असा गगनभेदी घुमणारा आवाज..., लाखो वारकऱ्यांच्या ताणलेल्या नजरा अन् रोखलेला श्वास अशातच वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींच्या व अश्वांनी नेत्रदीपक दौड घेत उपस्थित वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या वारीतील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब येथे गुरुवारी सायंकाळी पार पडले. यावेळी वरुणराजानेही हजेरी लावली.लोणंद येथील अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा गुरुवारी दुपारी सुमारास खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश करण्यासाठी मार्गस्थ झाला. तालुक्याच्या सीमेवर दुपारी सरदेचा ओढा येथे फलटण तालुक्याच्या वतीने आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, जिल्हा परिषदचे सदस्य दत्ता अनपट यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.गेली दोन वर्षे रिंगण सोहळा न पाहता आल्याने भाविकांना वेध लागले होते. यामुळेच साऱ्यांची पावलेही आपोआप रिंगणस्थळी पडत होती. हा सोहळा पाहता यावा म्हणून महिलांसह अनेक वारकरी आधीच गर्दी करून बसले होते. दुपारी सव्वातीन वाजता माऊलींचा पारंपरिक मानाचा नगारखाना आला. त्यानंतर काही वेळाने पालखी रथ मंदिरासमोर आल्यावर कमालीची उत्सुकता ताणली गेली. यावेळी वैष्णवांच्या उत्साहाने सारा आसमंत भक्तिरसात चिंब झाला होता.रिंगणस्थळी रिंगण लावून घेतल्यावर क्षणार्धात साऱ्यांचे डोळे गर्दीतून धावत येणाऱ्या अश्वाकडे लागले होते. चोपदारांनी हात उंचावून इशारा करताच दुतर्फा वैष्णवांच्या मेळ्यातून माऊलींचा व स्वाराचा अश्व एका पाठोपाठ धावत सुटले. रथा पुढील व मागील दिंड्यांपर्यंत धावत जाऊन पुन्हा माघारी असंख्य डोळ्यांचे पारणे फेडणारी दौड घेत वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले.वर्षातून एकदाच पाहावयास मिळणारा हा सोहळा प्रत्येकाने आपल्या डोळ्यात साठवत माऊलींचा गजर करीत अश्वाच्या टापाची माती ललाटी लावत धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. त्यानंतर महिलांसह भाविकांनी फुगड्या, फेर धरत पारंपरिक खेळ करीत मनसोक्त आनंद लुटला. यावेळी अश्वाचा स्पर्श व पालखीतील माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी झुंबड उडाली. त्यानंतर मोठ्या भक्तिभावाने डोक्यावर तुळशी वृंदावन, भगवी पताका घेत तरडगाव मुक्कामासाठी वारकरी मार्गस्थ झाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी