शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

पावसाचा जोर ओसरला, कोयना धरण भरण्यास उशीर लागणार; महाबळेश्वरला फक्त १६ मिलीमीटरची नोंद 

By नितीन काळेल | Published: July 11, 2023 12:34 PM

धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला फक्त १६ तर नवजा येथे १७ मिलीमीटरची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना धरणक्षेत्रातहीपाऊस कमी असून पाणीसाठा २२.७७ टीएमसी झाला आहे. मात्र, पाऊस कमी असल्याने यंदा धरण भरण्यास उशिर लागणार आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिमेकडे पाऊस अधिक पडतो. कोयनानगर, नवजा तसेच महाबळेश्वर येथे दरवर्षी ५ ते ६ हजार मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद होते. या पावसावरच प्रमुख धरणे भरतात. कारण, पश्चिम भागात सर्वात मोठे धरण कोयना असून पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. त्यानंतर धोम धरणाची पाणी साठवण क्षमता १३.५० टीएमसी आहे. तर कण्हेर धरण १०.१०, उरमोडी ९.९६, तारळी ५.८५ तर बलवकडी धरणाची क्षमता ४.०८ टीएमसी इतकी आहे.पश्चिम भागात पाऊस पडलातरच ही धरणे भरतात. यंदा मात्र, पावसाने उशिरा सुरूवात केली आहे. तरीही अजून पावसाचा जोर नाही. त्यातच सध्या उघडझाप सुरू असल्याने धरणातही कमी पाणी येत आहे. यामुळे यंदा धरणे भरण्यास उशिर लागणार आहे.मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ११ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वरला १३६८ मिलीमीटरची झाली. त्यानंतर नवजा येथे १२५७ तर कोयनानगर येथे अवघा ८८५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठा २२.७७ टीएमसी झाला झाला आहे. त्यातच पाऊस कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. सकाळच्या सुमारास धरणात ७५७५ क्यूसेक वेगाने पाणी आवक होत होती. तर धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणKoyana Damकोयना धरण