सातारा : शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करणाऱ्या दिवसांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाप्रती दाखवलेली आस्था अवर्णनीय आहे. शोषणातून मुक्तीसाठी शिक्षणाची कास धरणाऱ्या बाबासाहेबांनी तमाम बहुजनांचे जीवन सार्थकी लावले, असे प्रतिपादन प्राध्यापक केशव पवार यांनी केले.येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शिक्षण व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यावेळी प्रा. पवार बोलत होते. विचार मंचावर आमदार विनोद निकोले, माजी आमदार जे. पी. गावित, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त नितीन उबाळे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, अरुण जावळे, प्रवीण धस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना प्रवीण म्हस्के यांनी लोकप्रतिनिधींवर आक्षेप घे. निवडणुकांच्या फडांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता भाषणाला सुरुवात न करणाऱ्या नेत्यांना आजचा दिवस स्मरणात राहत नाही. आंबेडकरांचे विचार जपण्याची आणि जगण्याची कुवत या नेत्यांमध्ये नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांना या कार्यक्रमापेक्षाही महत्त्वाची अन्य बैठक भासते याच्याइतके दुर्दैव नाही. विशेष म्हणजे ज्या शाळेचे अँबेसिडर डॉ. बाबासाहेब आहेत तिथं विद्यार्थी गळती कशी काय होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी विद्यार्थ्यांसह ॲड. वसंत नलावडे, विलास वहागावकर, रमेश गायकवाड यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.
शोषणातून मुक्तीसाठी शिक्षणाची कास - प्रा. केशव पवार
By प्रगती पाटील | Published: November 07, 2023 2:04 PM