शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, कोयना धरणात पाण्याची आवक सुरुच; पाणीसाठा किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: August 03, 2024 6:47 PM

नद्यांच्या पातळीत वाढ : नीरा जुना पूल अन् वाठार-वीर रस्ता बंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असला तरी धरणात आवक कायम आहे. यामुळे धरणातील विसर्गात वाढ करण्यात येत आहे, तसेच वीर धरणातूनही विसर्ग वाढविल्याने नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी खंडाळा तालुक्यात लाेणंदजवळचा नीरा जुना पूल आणि वाठार-वीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर २४ तासांत महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील साठाही ८८ टीएमसीजवळ पोहोचला आहे.पश्चिम भागात कास, बामणोली, नवजा, तापोळा, कोयना, महाबळेश्वरला मागील २० दिवसांपासून खंड न पडता पाऊस सुरू आहे. सुरुवातीला धुवाधार पाऊस पडला. त्यानंतर जोर कमी झाला. मात्र, तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा चांगलाच पडू लागला आहे. त्यातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. सध्या बहुतांशी धरणे ही ८० टक्क्यांवर भरली आहेत. त्यातच पावसाळ्याचे अजून दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील छोटी धरणे पाठीमागेच भरून वाहत आहेत, तर इतर धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पाटण तालुक्यातील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते. यंदा मात्र धरण भरणार आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात ८६.७१ टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर ४९ हजार क्युसेकने धरणात पाण्याची आवक होती. शुक्रवारपासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारीही पायथा वीजगृहातून २ हजार १०० आणि सहा दरवाजांतून ५० हजार क्युसेक वेगाने पाणी विसर्ग करण्यात येत होता. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७८, नवजाला ६० आणि महाबळेश्वरला ९० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली, तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ९३७, नवजा येथे ४ हजार ६२७ आणि महाबळेश्वरला ४ हजार ३२३ मिलिमीटरची नोंद झाली आहे.

शुक्रवारी रात्रीपासूनच वीरमधून विसर्ग वाढवला..वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच धरणाच्या वरील भागात असणाऱ्या नीरा देवघर धरणात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे, तसेच भाटघर १००, तर गुंजवणी धरणही ८७ टक्के भरले. या तिन्ही धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार शुक्रवारी रात्री साडेदहापासून वीरमधील विसर्ग वाढविण्यात आला. धरण सांडव्याद्वारे ३२ हजारांवरून ४२ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग होऊ लागलाय. त्यामुळे नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणriverनदी