पेट्री : शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण आठवडाभरापासून मुसळधार पावसाने पूर्णक्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यावरून शनिवारी रात्री नऊ वाजता मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून सातारकरांची पाण्याची चिंता मिटली. कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणीपातळीतही वाढ होऊन भांबवली, एकीव धबधबा मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे.शहराला दररोजचा पाणीपुरवठा, वातावरणातील उष्णतेमुळे आत्तापर्यंत एकूण सोळा फूट पाणीपातळीत घट होऊन मे महिन्याच्या अखेरीस पाणीपातळी ४५ फुटावर होती. मान्सूनने वेळेत हजेरी लावल्यानंतर धरणातील पाणीसाठ्यात एक फूट त्यानंतर चार फूट त्यानंतर पाच फुटाने वाढ झाली. मागील तीन दिवसांच्या पावसात सरासरी दिवसाला एकेक फुटाने पाणीसाठ्यात वाढ झाली. सद्य:स्थितीला धरणात एकूण ६१.०४८ फूट पाणीसाठा झाला. सड्यावरून पाणी वाहून ओढे, नाले, झरे मोठ्या प्रमाणावर वाहत मुसळधार पावसाने शनिवारी रात्री कास धरण ओव्हरफ्लो झाले.
मान्सूनच्या वेळेत आगमनाने गतवर्षीपेक्षा सतरा दिवस अगोदर दमदार पावसाने कास धरण ओव्हरफ्लो झाले. परिसरात मुसळधार पाऊस पडून धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला. मुसळधार पावसामुळे अर्धा टीएमसी पाणीसाठ्याचे कास धरण पूर्णपणे भरले. धरणाची उंची वाढवल्याने पूर्वीपेक्षा मागील वर्षीपासून पाचपट अधिक पाणीसाठा होत आहे. सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. सांडव्यावरून एक फूट पाणी वाहत आहे, अशी माहिती अशोका स्थापत्यचे अभियंता बद्रिनाथ देटे यांनी दिली.पाणीपातळीत वाढ गतवर्षीपासून एकंदरीत ७८.७२० फूट पाणीसाठा धरणात होत आहे. त्यापैकी पावणेअठरा फूट मृत पाणीसाठा आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही ६१.०४८ फूट पाणीसाठा झाला आहे. उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता देखील जास्त होती. त्यामुळे पंधरा ते सोळा फूट पाणीपातळी खालावली होती. परंतु, वेळेत मान्सूनला दमदार सुरुवात झाल्याने पाणीपातळीत वाढ होण्यास लवकर मदत झाली.
मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीपातळीत आठवडाभरात पूर्णतः वाढ होऊन यंदा पाणीसाठा ०.५० टीएमसी झाला आहे. गतवर्षीपेक्षा सतरा दिवस अगोदर धरण ओव्हरफ्लो झाले. -जयराम किर्दत, पाटकरी, कास धरण
कास धरण पूर्ण क्षमतेने वाहिले! (२०फूट पाणीसाठा असताना)सन२०१५-२३जूनसन२०१६-३जुलैसन२०१७-३०जूनसन२०१८-५जुलैसन२०१९-६जुलैसन२०२०-४जुलैसन२०२१-१७जूनधरणाची उंची वाढवल्यानंतर(पन्नास फूट पाणीसाठा असताना)सन२०२२-१५जुलै मध्यरात्रीसांडव्याची उंची अधिक वाढवल्यानंतरसन२०२३-२४जुलैसन २०२४-७ जुलै