शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

सांगलीतील उद्योजक सुमेध शहांच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ वाढले, सौमितच्या मौल्यवान वस्तू गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 1:09 PM

एवढेच नव्हे तर संरक्षण कठडे तोडून धडकलेल्या अवस्थेत त्याची कार आढळल्याने पोलिसांनी आता तपासाची दिशा बदलली आहे.

शिरवळ : सांगली येथील प्रसिद्ध उद्योजक सुमेध शहा यांचा मुलगा साैमित शहा (वय २३) याच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले असून, त्याची सोन्याची चेन, अंगठी, हातामधील सोन्याचे कडे, डिजिटल घड्याळ व महागडा मोबाइल गायब झाल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर संरक्षण कठडे तोडून धडकलेल्या अवस्थेत त्याची कार आढळल्याने पोलिसांनी आता तपासाची दिशा बदलली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील प्रसिध्द उद्योजक सुमेध शहा यांचा एकुलता एक मुलगा असलेला सौमित शहा हा पुण्यातील वाकड, पिंपरी-चिंचवड परिसरातील एका हॉटेलमध्ये शनिवारी सायंकाळी जेवण करण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. जेवण ऑनलाइन मागविल्यानंतर अचानकपणे सौमित याने मी मैत्रिणीला भेटून येतो, असे सांगत कारमधून निघून गेला. मात्र उशिरापर्यंत तो आला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी त्याचा मृतदेह निरा नदीत आढळून आला. त्याचा घातपात झाला की त्याने आत्महत्या केली, याचे गूढ शवविच्छेदनानंतरही कायम आहे.सोमवार, दि. ७ रोजी दुपारी सातारा येथील ठसे तज्ज्ञांना व ‘वीर’ या श्वानाला पाचारण करण्यात आले. कार आढळून आलेल्या ठिकाणी कारसह परिसराची कसून तपासणी करण्यात आली. परंतु ठसे तज्ज्ञांच्या हाती काही सापडले आहे का, हे मात्र, गोपनीय ठेवण्यात आले आहे. साैमितच्या कारने सारोळा पुलाच्या परिसरातील संरक्षण कठडेही तोडले आहेत. कारची पुढची बाजू चेपली आहे. तर दुसरीकडे साैमितच्या माैल्यवान वस्तू गायब झाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ आणखीनच वाढले आहे.फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर, जितेंद्र शिंदे, तुषार अभंग, नितीन महांगरे, सचिन वीर, सुनील मोहरे, मंगेश मोझर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ परिसर पिंजून काढला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई या करीत आहेत.दरम्यान, सोमवार सकाळी सांगली येथील स्मशानभूमीमध्ये सौमित शहा याच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.मोबाइल उलगडणार रहस्य...सौमितच्या मौल्यवान दागिन्यांसह त्याचा महागडा मोबाइलही गायब झाला आहे. या मोबाइलचा सीडीआर आणि लोकेशन काढल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे गूढ उलगडणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. साताऱ्यातील सायबर तज्ज्ञ अजय जाधव हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस