शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
3
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
4
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
5
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
6
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
7
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
8
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
9
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
10
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
11
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
12
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
13
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
14
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
15
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
16
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
17
नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट
18
...तर हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ
19
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
20
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

सातारा: अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून वृद्ध दरीत पडला, १४ तासांहून अधिक वेळाने बाहेर काढले; अन्

By दत्ता यादव | Published: August 06, 2022 2:03 PM

दरीतून आवाज येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यानंतर नागरिकांनी थोडे दरीत उतरून पाहिले असता कोणीतरी व्यक्ती दरीत पडल्याचे निदर्शनास आले.

सातारा: येथील अजिंक्यतारा किल्ल्यावरून पाय घसरून तब्बल दोनशे फूट दरीत पडून हणमंत जाधव (वय ६४, रा. दौंड, पुणे) हे गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे १४ तासांहून अधिक वेळ ते दरीत पडून होते. आज, शनिवारी सकाळी शिवेंद्रसिंहराजे रेक्स्यू टीमच्या जवानांनी त्यांना दरीतून बाहेर काढले. सुदैवाने त्यांचा जीव वाचविला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अजिंक्यताऱ्यावर अनेकजण फिरण्यासाठी जातात. हणमंत जाधवही काल, शुक्रवारी सायंकाळी अजिंक्यताऱ्यावर गेले होते. त्यावेळी चालत असताना ते पाय घसरून दरीत पडले. अंधार असल्यामुळे ते रात्रभर दरीतच पडून राहिले.आज, शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास काहीजण अजिंक्यताऱ्यावर फिरण्यासाठी जात असताना दरीतून आवाज येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यानंतर नागरिकांनी थोडे दरीत उतरून पाहिले असता कोणीतरी व्यक्ती दरीत पडल्याचे निदर्शनास आले. याबाबत शिवेंद्रसिंहराजे  ट्रेकरच्या जवानांना नागरिकांनी तत्काळ माहिती दिली. जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. रोप बांधून जवान दरीत उतरले.तब्बल १४ तासानंतर जाधव यांना दरीतून वर काढण्यात यश आले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाधव हे साताऱ्यात कोणासोबत आले होते. हे अद्याप समोर आले नसून पोलीस त्यांच्या नातेवाइकांकडे चौकशी करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगड