प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: पाटणचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई यांचे अलीकडचे बोलणे जमिनीवरून दिसत नाही. हेच शंभूराज देसाई त्यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे ऋणातून मी कसा उतराई होऊ असे म्हणाले होते. आज मात्र त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यामुळे पाटणची जनता वेळ आल्यावर त्यांचा हिशोब चुकता करील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे नेते, माजी मंत्री भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला. पाटण येथे बुधवारी आमदार भास्कर जाधव यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी जाधव बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
भास्करराव जाधव म्हणाले, काही महिन्यांपूर्वी शिवसेना संपविणयाचे कारस्थान झाले.पण शिवसेना संपली नाही. महाराष्ट्र उध्दव ठाकरे यांचे मागे ठामपणे उभा राहिला. अंधेरी निवडणुकीत ते दिसले असुन या निवडणुकीत सर्वानी उध्दव ठाकरेंना पाठींबा दिला. ज्यांना विश्वासाने आमदार केले त्यांनी पाटण मध्ये शिवसैनिकांना धोका दिला आहे.त्यांना जनता घरी बसवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अधिवेशनातील मंत्री देसाई यांच्या उत्तरात दम व अभ्यास नव्हता असेही एका प्रश्नाला उत्तर देताना जाधव म्हणाले. तसेचशंभुराज देसाई यांनी शिवसेनेतुन बाहेर गेलेल्या गटाचे बाळासाहेब देसाई शिवसेना असे नाव घ्यावे असा सल्लाही त्यांनी दिला. बंडखोर शिवसेना पुढे घेऊन निघालो म्हणतात मग शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी का घालवली? असा सवालही जाधव यांनी केला.
शिवसेनेने आजपर्यंत भाजपा हा एकच मित्र मानला.पण त्यानेच विश्वाघात केला. आता नवीन मित्रकरुन सेना वाढविणयाचा निर्णय आहे. चांगले नवीन मित्र मिळत आहेत अशी प्रतिक्रिया वंचितशी आघाडी होईल का? या प्रश्नावर दिली.