शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

खून केला तरी पचवायची ताकद, महिला वनरक्षक मारहाण प्रकरणातील आरोपीची वल्गना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 4:56 PM

वेळ पडली तर थेट मंत्रालयापर्यंत आपला वट आहे. आपलं कोणच काही बिघडवू शकत नाही!

सातारा : साताऱ्यात सर्विस करायची तर जानकर बरोबर सरळच राहावे लागते, मारामाऱ्या काय खून केला तरी पचवण्याची ताकद ठेवतो हा फकड्या... वेळ पडली तर थेट मंत्रालयापर्यंत आपला वट आहे. आपलं कोणच काही बिघडवू शकत नाही! यासह अनेक वल्गना करणारा रामचंद्र जानकर याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या नंतर त्याचे एकेक किस्से बाहेर येऊ लागले आहेत.सज्जनगडापासून अवघ्या काही अंतरावर पळसावडे हे गाव आहे. या गावात वनव्यवस्थापन समितीचा अध्यक्ष रामचंद्र जानकर आणि त्याची पत्नी प्रतिभा जानकर यांनी वनरक्षक सिंधू सानप यांना मारहाण केली. याठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांना धाक दाखविण्याचा याचा कायम प्रयत्न असायचा. अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे, अर्वाच्च बोलणे बघून घेतो म्हणणे आणि आपण कोणाच्या बापाला भीत नाही अशा अविर्भावात कायम वावरणाऱ्या या रामचंद्राचे वेगळेच रामायण आता समोर येऊ लागले आहे.

पळसावडे या गावाची लोकसंख्याही शंभरच्या आत आहे. गावात लोकसंख्या कमी असल्याने जानकर याच्या विषयी तक्रार करायला कधीच कोणीच पुढे आले नाही. काही दिवस राजघराण्यात सेवा बजावल्यानंतर वर्तणुकीमुळे त्याची जलमंदिर आणि सुरुची या दोन्ही ठिकाणांहून हाकलपट्टी करण्यात आली होती.गावाकडे याविषयी कोणालाच माहिती नसल्याने प्रत्येकाला हा राजघराण्याच्या संपर्कात असल्याचीच भावना होती. वेळ पडली तर पोपटपंची करून दोन्ही वाड्यावरील शिलेदारांच्या संपर्कात राहून आपलं काम करण्याची त्यांची हातोटी होती. राजकीय लोकांच्या नावाने स्वतःचे महत्व वाढवणाऱ्या जानकर याच्या त्रासाने सर्वजण त्रस्त झाले होते. सिंधू सानप यांच्या प्रकरणामुळे त्यांची मुजोरी कमी होईल अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी ''लोकमत''कडे नोंदविल्या.म्हणे तुम्हाला काम बघून काय करायचंयवनक्षेत्रात खुरपणी करण्यासाठी सुमारे ३० हजार रुपये मंजूर झाले होते. काम न करता हे बिल अदा व्हावे अशी जानकरची इच्छा होती. ''नोकरीसाठी आलाय गपगुमान नोकरी करा आपल्या गावाला जावा आम्ही केलेलं काम बघून तुम्हाला काय करायचंय'' असे म्हणूनही सिंधू यांनी विरोध केल्यानंतर रामचंद्र जानकरने स्थानिक महिलांना तेथे कामासाठी लावले. हे काम लवकर पूर्ण करून बिल काढून घेण्यासाठी त्याचे प्रयत्न असतानाच वनक्षेत्रात प्राणी गणना करण्यासाठी आमच्या महिलांना का नेले याचा त्रास त्याला झाला. यातूनच त्याने सिंधू यांना मारहाण केल्याचे स्थानिक सांगतात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर