शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
2
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
3
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
4
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
5
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
6
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
7
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
8
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
9
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
10
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
11
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
12
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
13
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
14
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
15
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
16
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
17
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
18
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
19
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

झेंडूच्या फुलांना केराची टोपली, दसऱ्यापूर्वीच बहरल्यामुळे दर गडगडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:41 AM

रस्त्यावरच ढीग; कॅरेट थेट कचरागाडीत

माणिक डोंगरेमलकापूर : वातावरणातील बदलामुळे व पाऊस कमी आणि उष्णता वाढल्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्ताच्या अगोदरच बहरल्यामुळे झेंडूच्या फुलांचे दर गडगडले आहेत. किलोला २० रुपये दर मिळत नसल्याने रस्त्यावर ढीग लागले. नाईलाजास्तव क्रेट थेट कचरागाडीत टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. रस्त्यावर टाकलेले फुलांचे ढीग जेसीबीने गोळा करत झेंडूच्या फुलांना मुंबई मार्केटमध्ये थेट कचरागाडीची वाट दाखवली आहे.मलकापुरातील शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नेहमीच्या पिकांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी भाजीपाला व फुलशेतीसह इतर पिकाकडे वळले आहेत. यावर्षी झेंडू उत्पादक शेजाऱ्यांना कमी पाऊस असल्यामुळे झेंडूच्या बागा जोपासणे सोपे झाले होते. फुलांना दसऱ्याला दर मिळेल व उत्पन्न वाढेल या उद्देशाने शेतकऱ्यांनी झेंडूच्या रोपांची लागवण केली. माल बाजारात नेण्यापर्यंतच्या खर्चाचा विचार करता फुलांना दरवर्षी जेमतेम २० ते ८० रुपये प्रती किलो दर मिळत होता. दसरा दिवाळीला तर ग्राहक मिळवतानाही ओरडून घसा कोरडा करावा लागत होता. मात्र यावेळी पाऊस प्रमाणात असल्यामुळे फुलशेती चांगलीच बाहरली होती.

दसऱ्याऐवजी काही दिवस अगोदरच फुले विक्रीयोग्य झाली. फुलाचे उत्पादन जास्त झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत उठाव होत नव्हता. शेतकऱ्यांना पुणे, मुंबईसह बेंगळुरूसारख्या मोठ्या बाजारपेठेत धाव घ्यावी लागली. फुले दसऱ्यापर्यंत टिकवणे कठीण झाले होते. परिणामी शेतकऱ्यांना लवकरच फुले तोडून बाजारात घेऊन जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत वाहने भरून गेले असता फुले घेण्यासाठी ग्राहकच मिळेना.दरवर्षी शेतकऱ्यांच्या फुलांना घाऊक बाजारात किलोला ५० ते ६० रुपये दर मिळत असे. मात्र यावर्षी २० रुपये सुद्धा दर देण्यास कोणी तयार होत नाही. एक-दोन दिवसातच फुले खराब झाल्याने क्रेट थेट कचरागाडीतच ओतावे लागले. तर काही शेतकऱ्यांनी बाजारतळातच फुलाचे ढीग आहे, तसेच सोडून यावे लागले. संबंधित बाजार समिती प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने फुलाचे ढीग कचरा गाडीत भरले. अशा अवस्थेमुळे फुलशेती उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक व उत्पादन खर्चही न आल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.

यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांच्या बागा केल्या. पावसाने उघडीप दिली. दसऱ्याला फुले विक्रीयोग्य होतील, असे वाटत होते. मात्र वातावरणातील बदलामुळे लवकर फुले विक्रीयोग्य झाली. त्यामुळे फुलांची आवक वाढली. मुंबईच्या मार्केटमध्ये दर मिळेल या आशेने गेलो. मात्र तेथेही निराशाच झाली. अनेक शेतकऱ्यांना फुले कचऱ्यात टाकावी लागली. - अशोकराव पाचुंदकर, झेंडू उत्पादक शेतकरी. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर