शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सातारा अन् माढ्याचा तिढा निवडणूक घोषणेपूर्वी सुटणार?; बैठका, चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच

By नितीन काळेल | Published: March 08, 2024 6:55 PM

महायुतीत दावे-प्रतिदावे: आघाडीत शरद पवार सबकुछ 

सातारा : लोकसभेची निवडणूक एप्रिल महिन्यात होत असलीतरी सातारा आणि माढा मतदारसंघातील उमेदवार अजून ठरलेले नाहीत. महायुतीत तर दावे-प्रतिदावे सुरू आहेत. मात्र, महाविकास आघाडीत शरद पवार यांच्यावरच उमेदवार ठरणार आहे. पण, बैठका, जागावाटप चर्चेचं सतत गुऱ्हाळ सुरूच असल्याने निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीतरी उमेदवार ठरणार का ? याविषयी साशंकता आहे.

लोकसभेचे सातारा आणि माढा मतदारसंघ दरवेळी उमेदवारीवरुनच चर्चेत येतात. यातील सातारा हा सातारा जिल्ह्यातीलच सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून बनलेला आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील चार आणि साताऱ्यातील माण आणि फलटण या दोन विधानसभा मतदारसंघाचा मिळून तयार झालेला आहे. २००९ पासूनच्या तीन निवडणुका या आघाडी आणि युतीत ज्या पक्षाकडे मतदारसंघ, त्यांच्यातीलच उमेदवार ठरुन लढल्या गेल्या. पण, गेल्या दीड वर्षातील राजकीय घडामोडीने मतदारसंघांबाबत तिडा निर्माण झालेला आहे.तर महाविकास आघाडीत हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे राहणार आहेत. पण, महायुतीत अजून मतदारसंघ कोणाकडे जाणार हे स्पष्ट नाही. सातारा मतदारसंघावर तर युतीतून शिवसेनेचा पूर्वीपासून दावा होता. पण, तो राजकीय घडामोडीत मागे पडलाय. आता अजित पवार गटाने मतदारसंघ लढविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी पक्षातील नेत्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबरोबर बैठकही झाली. त्यामध्येही सातारा मतदारसंघाचा आग्रह धरण्यात आला.अशातच आता ‘रिपाइं’ आठवले गटानेही दावा केलाय. तर भाजपमधून खासदार उदयनराजे भोसले यांची तयारी पूर्ण झालेली आहे. पण, राष्ट्रवादीच्या ठाम भूमिकेमुळे मतदारसंघ कोणाकडे जाणार हे गणित सुटलेच नाही. अशातच आता अजित पवार गटाने माढा मतदारसंघावरही दावा ठोकलाय. वास्तविक माढ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे खासदार आहेत. भाजपकडून तेच दावेदार आहेत. पण, अजित पवार गटाचे व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा विरोध आहे. रामराजेंनी बंधू संजीवराजेंसाठी माढ्यावर हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे. यामुळे महायुतीत माढा मतदारसंघ कोणाला जाणार याचा तिडा वाढलाय.महाविकास आघाडीत सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीचा शरद पवार गट लढविणार आहे. पण, याठिकाणी उमेदवार स्पष्ट नाही. राष्ट्रवादी अंतर्गतच एकमेकांना विरोध करण्याचे काम सुरू झाले आहे. तर माढ्यात शरद पवार गटाकडे काही पर्याय आहेत. तरीही रासपचे महादेव जानकर यांना आघाडीत घेण्याची खेळी शरद पवार यांच्याकडून होऊ शकते. त्यामुळे आघाडीत राष्ट्रवादीचा उमेदवार लढणार की नाही याविषयीही अजून स्पष्टता नाही. त्यामुळे सातारा आणि माढा मतदारसंघातील उमेदवार अजून स्पष्ट झालेले नाहीत. उलट तिडा वाढतच चालला असल्याचे दिसत आहे.

उमेदवारावर लढत काट्याची की मताधिक्क्याची ठरणार..

सातारा आणि माढा मतदारसंघातही आघाडी आणि युतीचे उमेदवार कोण यावरच लढत काट्याची का मताधिक्क्याची ठरणार हे समजणार आहे. तरीही साताऱ्यात शरद पवार गटाचा उमेदवार हा तगडा असणार हे स्पष्ट होत आहे. तो पक्षातील किंवा बाहेरुन आलेला असेल हे लवकरच समजेल. तर युतीत सातारा मतदारसंघ कोणाकडे हेच स्पष्ट नाही. त्यामुळे अंदाज बांधणे अवघड झाले आहे. माढ्यातही रंगतदार सामना होऊ शकतो. भाजपला मतदारसंघ गेल्यास रणजितसिंह नाईक-निंबाळकर पुन्हा रिंगणात असणार आहेत. पण, त्यांच्या विरोधात ‘रासप’चे महादेव जानकर असल्यास तुल्यबळ लढत होऊ शकते. जर जानकर महाविकास आघाडीत न गेल्यास माढ्यात शरद पवार गटाचाही उमेदवार राहणार आहे. त्यामुळे महायुती, आघाडी आणि रासपमध्ये सामना होऊ शकतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणmadha-acमाढा